‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे प्रथा कलेक्शन सादर…

मुंबई: महाराष्ट्रातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे भारतातील लग्नसराईच्या काळासाठी नववधूच्या दागिन्यांचे नावीन्यपूर्ण ‘प्रथा कलेक्शन’ सादर करण्यात आले आहे. हे आकर्षक कलेक्शन विवाह सोहळ्याच्या समृद्ध प्रथा आणि परंपरांचा उत्सव साजरे करणारे आहे.

यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये हे कलेक्शन पहिल्यांदा सादर केले गेले. त्यानंतर राज्यभरातून या कलेक्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भरजरी नववधूचे दागिने, नेकलेसेस, चोकर्स, आकर्षक हिऱ्यांचे दागिने, ईअर रिंग्स, रिंग्स, मांग टिका, कडा इत्यादींद्वारे हे ‘प्रथा कलेक्शन’ जुन्या परंपरेच्या कलाकृतीतून व्यक्त होणारा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविते. तसेच हिऱ्याच्या दागिन्यांच्या चाहत्यांसाठी या कलेक्शनचा विस्तार केला गेला असून चमकदार पोल्की, कुंदन आणि मोत्याच्या दागिन्यांचे डिझाईन उपलब्ध करण्यात आले आहे. बारीक, नाजूकशा रचनांद्वारे सोन्याच्या दागिन्यांसह ‘प्रथा कलेक्शन’च्या नव्या आवृत्तीमध्ये मीनाकारी आणि जडाऊ डिझाईन्सची उत्कृष्टता समाविष्ट करण्यात आली आहे. लग्नसराईशी संबंधित सर्व प्रसंगांसाठी नववधूच्या पसंतीनुसार पारंपरिक दागिन्यांमध्ये समकालीन डिझाईन्सचा मिलाफ करण्यात आला आहे.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘आम्ही जेव्हा पहिल्यांदाच प्रथा कलेक्शन सादर केले होते. तेव्हाच हे कलेक्शन आमच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. आता मोती, जडाऊ, कुंदन आणि मीनाकारी कलाकुसरच्या जोडीने आम्ही नववधूच्या दागिन्यांच्या श्रेणीत आणखी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. परंपरा आणि नवीन कल यांचा उत्तम मिलाफ असलेले प्रथा कलेक्शन प्रत्येक नववधूच्या वैयक्तिक पसंतीनुसार डिझाईन केले जाऊ शकतात.’

‘पीएनजी ज्वेलर्स’चे ‘प्रथा कलेक्शन’ हे आधुनिक काळातील नववधूंसाठी डिझाईन केले गेले असून यामध्ये अनकट व रंगीत रत्नांसह डिझाईन केलेले आकर्षक दागिने आहेत. विवाह सोहळा अधिक भव्य-दिव्य करण्यासाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपल्या महाराष्ट्र व गोव्यातील सर्व स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाईन माध्यमाद्वारे १५ डिसेंबर २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान विशेष मोहीम राबविली जाणार आहे.