मुंबई: मुंबईतील सिंधुदुर्ग प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने मालवणी बोली संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उपक्रमाअंतर्गत ‘गजालीतली माणसं’ आणि ‘गजाल गाथण’ पुस्तकांचे आज कांदिवली येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लबमध्ये प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर भोगले आणि मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक आणि ‘अज्ञात मुंबई’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
प्रकाश सरवणकर यांचे ‘गजालीतली माणसं’ आणि पूर्णिमा गावडे मोरजकर यांचे ‘गजाल गाथण’ अशी मालवणी लेखकांची ही दोन पुस्तके आहेत. या प्रकाशन सोहळ्याला रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.