मुंबई:आर्थिक सुधारणांवर भर देणारे एक स्थिर सरकार केंद्रात असल्याने रिटेल उद्योग आणि त्याद्वारे दागिने व सोन्याच्या उत्पादनांच्या खरेदीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केली.
‘सामान्य लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल,उद्योग विकासाला चालना मिळेल आणि पायाभूत सुविधांचा अधिक जलद विकास होईल, अशा उपाययोजना यावर्षीच्या अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. आर्थिक सुधारणांवर भर देणारे एक स्थिर सरकार केंद्रात असल्याने रिटेल उद्योग आणि त्याद्वारे दागिने व सोन्याच्या उत्पादनांच्या खरेदीमध्ये वाढ होईल अशा अनेक उपाययोजना आणल्या जाव्यात,अशी आम्हाला अपेक्षा आहे.’असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.