मुंबई : भारतात शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आघाडीची युनिकॉर्न एड-टेक कंपनी, फिजिक्स वाला म्हणजेच पीडब्ल्यू, भारतभरात नवीन तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन केंद्रे, पीडब्ल्यू विद्यापीठ सुरू करीत आहे. विद्यार्थ्यांना पीडब्ल्यूएनएसएटी २०२३ म्हणजेच फिजिक्स वाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट २०२३ द्वारे १००% पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी आहे, ज्याद्वारे पीडब्ल्यू द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना २०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ही परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार असून, ही परीक्षा सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच जेईई किंवा नीटसाठी अभ्यास करू इच्छिणाऱ्या ड्रॉपर्ससाठी खुली असेल.
पीडब्ल्यूएनएसएटी परीक्षा १, ८ आणि १५ ऑक्टोबर २०२३ ला ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल आणि विद्यार्थी १ ते १५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. परीक्षेसाठीची नोंदणी ही, पीडब्ल्यू वेबसाइट, अॅप किंवा जवळच्या ऑफलाइन विद्यापीठ केंद्रावर १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल.
पीडब्ल्यूचे विद्यापीठ ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता म्हणाले, ‘कोविड-१९ नंतर शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. विद्यार्थी आता ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचा लाभ घेतात. पीडब्ल्यू येथे आम्ही मिश्रित दृष्टिकोनावर पुढील मार्ग म्हणून ठाम विश्वास ठेवतो. शहरांमध्ये आमच्या तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन विद्यापीठ केंद्रांचा विस्तार करून, आमचे ध्येय हे, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शहरात दर्जेदार शिक्षण मिळणे सुनिश्चित करणे आहे, जेणेकरून त्यांना दूरच्या शहरांमधील शिक्षण केंद्रांमध्ये स्थलांतरित होण्याची आवश्यकता नाहीशी होईल. आमच्या विद्यार्थ्यांना अधिक सहाय्य पुरवण्यासाठी, आम्ही आमच्या पीडब्ल्यूएनएसएटी परीक्षेद्वारे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्याचे उद्दीष्ट ठेवतो. गेल्या वर्षी, १.१ लाख विद्यार्थ्यांना १२० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या पीडब्ल्यूएनएसएटी शिष्यवृत्तीचा लाभ झाला होता. हीच परंपरा पुढे चालू ठेवत यावर्षी आम्ही २०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देत आहोत.’
पीडब्ल्यू विद्यापीठ सध्या भारतातील ३८ शहरांमध्ये ६७ केंद्रे चालवते आणि सुमारे दीड १.५ लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्यात प्रवेश घेतलेला आहे. आणखी २६ केंद्रे उघडून, पीडब्ल्यू आपली ऑफलाइन उपस्थिती वाढवत आहे. ऑफलाइन विद्यापीठ केंद्रे, जेईई-नीटसाठी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश करणारा सर्वसमावेशक अभ्यासक्रम प्रदान करतात आणि फिजिक्स वाला सातत्याने अपवादात्मक निकाल देतात.