चैत्री नवरात्रौत्सव भक्ती व कलामहोत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण
नवी मुंबई : ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित होत असलेल्या ठाणे येथील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ‘चैत्री नवरात्रोत्सव २०२४ भक्ती व कला महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी १२ एप्रिलला समाजामध्ये विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नवी मुंबईतील पत्रकार राजेंद्र घरत यांची अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत तेवीस पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल देवीच्या मूर्तीचे सन्मानचिन्ह, शाल व वस्त्रप्रावरणे देऊन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष कारखानीस, किरण गावंड, अथर्व बेडेकर, डॉ. संतोष पाठारे, अमेय गावंड, महेश आंब्रे, संदीप विचारे. निशिकांत महांकाळ, विनोद देसाई, युट्युबर विनायक माळी (विशेष पुरस्कार) यांचाही त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच ठाणे आणि परिसरातून नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी म्हणून अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे, निधी सामंत (विशेष पुरस्कार ) यांनाही गौरवण्यात आले नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार मिळवणाऱ्या या सर्व विजेत्यांना देवीच्या आरतीचा मान देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ, ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे, शिक्षण तज्ञ श्रीमती मीरा कोरडे यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.