‘साती साती पन्नास’ राजेश देशपांडे दिग्दर्शित नाटकांचे प्रयोग रंगणार…

मुंबई: नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. सृजन द क्रियेशन ही नवोदित कलाकारांना प्रशिक्षण आणि संधी देण्याचा प्रयत्न करणारी संस्था गेली चार वर्षे सातत्याने अनेक एकांकिका, नाटके, अभिवाचने, शॉर्ट फिल्म्स करत आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवत आहे. या संस्थेतून तयार झालेले कलाकार व्यवसायिक नाटके, मालिका यात स्थिरस्थावर होऊ पहात आहेत.

या वर्षी सृजन द क्रियेशन ज्येष्ठ लेखक संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘साती साती पन्नास’ या स्त्रियांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग दिनांक रविवार २२ डिसेंबर ते गुरुवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता ॲक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे होणार आहेत. या नाटकाचे संगीत आणि गीत गायन श्रद्धा नांदूर्डीकर ह्यांनी केले आहे तर नृत्य सिद्धेश दळवी यांनी बसवली आहेत.श्रद्धा माळवदे , चैताली जोशी, गीता पेडणेकर, अर्चना पाटील, गौरवी भोसले, स्वरांगी जोशी, निनाद चिटणीस या नवोदित कलाकारांच्या अभिनयाने हे नाटक सजलं आहे.

शिवशाही कला क्रिडा केंद्र यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले. प्रयोगाची तिकीटे प्रयोगाआधी अर्धा तास सभागृहावर उपलब्ध होतील, तरी सर्व नाट्य रसिकांनी या प्रयोगांचा आनंद घ्यावा, असे संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे यांनी आवाहन केले आहे.