मुंबई: “शिवा” मालिकेत किर्ती रॉकी आणि संपदाला एकत्र पाहते आणि लक्ष्मणला, रॉकी व शिवाविरुद्ध भडकवते. किर्ती आणि सुहासच्या मदतीने लक्ष्मण गुंडांच्या मदतीने रॉकीला अमानुष मारहाण करवतो. त्यामुळे त्याची आयएएस (IAS) ट्रेनिंग चुकते, शिवाला रॉकीवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळते. ती ठरवते की या कटामागचा खरा सूत्रधार शोधायचा. गुंड लक्ष्मणचं नाव घेतात. त्यामुळे देसाई हाऊसमध्ये मोठा संघर्ष होतो. मात्र, लक्ष्मण शिवालाच दोषी आणि “शिवा, तुझ्यामुळेच रॉकी या घरात आला आणि संपदाच्या प्रेमात पडला असल्याचं सांगतो.”. सीताई शिवावर घर मोडल्याचा आरोप करते. आता संपूर्ण देसाई कुटुंब शिवाच्या विरोधात आहे. पण आशु तिच्या पाठीशी उभा राहतो. लक्ष्मण संपदाच्या लग्नाची घोषणा करतो. भाऊ आणि आशु, लक्ष्मणला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. या सगळ्यामुळे संपदा घरातून पळून जाणायचा निर्णय घेते. संपदा पळून गेल्याचा दोष लक्ष्मण पुन्हा शिवालाच देतो . अखेर, शिवा आणि आशु संपादचा शोध सुरू करतात. शिवा-आशु या दोघांच्या पाठीशी उभे आहेत. संपदा आणि रॉकीला परत आणल्यानंतर, शिवा आणि आशु सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की रॉकीच भविष्य किती उज्वल आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या विरोधात जाणं चुकीचं ठरेल. आता लक्ष्मण शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी रॉकीला पाच पाच वर्षाचा वेळ द्यायचं ठरवतात.
आशु आणि शिवाने उचललेलं हे पाऊल रॉकी आणि संपदाच्या भविष्यसाठी उज्वल ठरेल का? सीताई, शिवाला समजून घेईल का? यासाठी बघायला विसरू नका “शिवा” दररोज रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.