मुंबई: ज्येष्ठ देशभक्त समाजसेवक शंकर देवजी मासावकर यांचे काल दिनांक २ जानेवारी २०२६ ला दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यामागे पत्नी शुभांगी शंकर मासावकर, पुत्र विनित, विज्ञानेश, मुलगी विद्या, सूना, जावई आणि नातवंडे आहेत. त्यांच्यावर नेरळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मासावकरांच्या निधनाने मुंबईतील समाजकार्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
शंकर देवजी मासावकर केंद्रीय टपाल कामगार सेनेचे माजी उपाध्यक्ष होते.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते आजीवन सदस्य होते.
शंकर देवजी मासावकर यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५१ ला झाला. त्यांना बालवयापासून विद्यार्थीदशेतच समाजकार्य आणि देशसेवेची आवड होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे ते अनुयायी होते. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा पुरस्काराने तसेच विविध संस्थाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शंकर मासावकर मुख्य टपाल कार्यालय जीपीओत ऑगस्ट १९७१ पासून टपाल कर्मचारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते मुख्य टपाल कार्यालय जीपीओतून निवृत्त झाले होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन, वृत्तपत्रलेखन, कविताही केल्या.
२५ ऑगस्ट १९७६ ला रेल्वे अपघातात गुडघ्याखाली दोन्ही पाय कापावे लागले, भयंकर अपघातामुळे महत्वकांक्षेचे पंख मात्र कापले गेले नाही, अपघातानंतर १९७८ मधील अ.भा. मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष पु. भा. भावे यांच्या समारोपाच्या भाषणात काही दलितांनी बेगडी पुरोगाम्यांसह गोंधळ घातला त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आग्रीपाडातील पुरोगामी हिंदु दलित युवकांनी सम्राट विकास मंडळाच्या वतीने शिवराज्याभिषेक उत्सवात पु. भा. भावे यांचा सार्वजनिक सत्कार घडवून आणला. हे अपघातानंतर पहिले प्रकट कार्य. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणी कामगार मोर्चा, कामगार विरोधी धोरण, मुंबईतील स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे शिवराय संचलन, अन्य सार्वजनिक मेळाव्यात सक्रिय सहभाग होता.
सम्राट विकास मंडळाच्या माध्यमातून विधायक समाजकार्याला प्रारंभ केला. समाजकार्याच्या प्रवासात घरात अठराविश्व दारिद्रय असताना समाज नि देशाचा विचार करणारे हे मासावकरांचे धाडसच म्हणावे लागेल. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातून महाराष्ट्र राज्य साकारल्यानंतर देशावरील चिनी आक्रमणाप्रसंगी १९६४मध्ये मंडळाच्या वतीने श्रमदानाच्या मोहिमेतून अनेकांकडून कामे करुन राष्ट्रीय संरक्षण निधीस सहाय्य. आचार्य अत्रेच्या दैनिक मराठा’त ठळक प्रसिद्धी. आग्रीपाडा रहिवासी संघासोबत खाद्याला खांद्या लावून सैनिकांसाठी रक्तदान मोहिमेत सम्राट विकास मंडळाला सहभागी करण्यात अग्रेसर.
१९६५च्या भारत पाक युध्दावेळी साठेबाज, काळाबाजार करणाऱ्या व्यापारांना धडा शिकावण्यात अग्रेसर. प्रकाशबंदीच्या काळात जनजागृती मे आणि दिवाळीच्या सुटदोन रात्र शाळा भरवणे, पुस्तकपेढी निर्माण करणे, सर्व राष्ट्रीय सण आणि उत्सव साजरे करणे, स्पर्धा शिबिरे भरवणे आदीमध्ये सहभागी होते.
१९६६ मध्ये आग्रीपाडा पोलिस ठाण्याजवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेतयात्रा येताच खेळाचे मैदान सोडून धावत धावत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंत्यदर्शन घेतले. मंडळाच्या साम्यवादी अध्यक्षांकडून वीर सावरकराविषयी एकले आणि आयुष्याचा गुरु लाभला, स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांचा ध्यास, अभ्यास, प्रचार आणि कामगार क्षेत्र, दलित समाज, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सावरकरांना प्रसार सातत्याने केला, जणू काही हेच त्यांचे ध्येय
सुधीर फडकेंना (बाबुजी) महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम पुरस्कार मिळाल्यानंतर टपाल विभाग स्थानिय लोकाधिकार समिती, टपाल कामगार नि मित्रमंडळीच्या वतीने बाबुजीच्या निवासस्थानी राष्ट्रपुरुषांना उत्सव साजरा करुन बाबुजींचा सत्कार करण्यात आला. बाबुजीच्या सावरकर चित्रपटाला अर्थसहाय्य मिळवून देण्यात त्यांचाही समावेश होता.
शंकर देवजी मासावकर यांना लाभलेले विविध पुरस्कार
‘समाजसेवा देशभक्ती गौरव पुरस्कार १९८०’ मसुराश्रम, गोरेगाव, मुंबई.
‘सामाजिक कार्याचा देशभक्ती पुरस्कार १९८२
पु. भा. भावे स्मृती समिती, मुंबई.
‘कृतिशील अनुयायी पुरस्कार १९९९’
सावरकर तत्वज्ञान प्रसार केंद्र,
‘टपाल कामगार सार्वजनिक शिवजयंती गौरव पुरस्कार १९९८’ टपाल विभाग स्थानिय लोकाधिकार समिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, प्रमुख टपाल कार्यालय, मुंबई.
समाजसेवा गौरव पुरस्कार २०००
सम्राट विकास मंडळ, आग्रीपाडा, मुंबई.
‘अष्टगंध सामाजिक सेवा पुरस्कार २००२ – अष्टगंध संस्था, मुंबई
‘महाराष्ट्र अपंग मित्र पुरस्कार २००५
स्वरमयी संस्था, मुंबई
‘राष्ट्रीय अंकात्मता फेलोशिप पुरस्कार २०१० भारतीय समाज विकास प्रबोधिनी, मुंबई.