जुहूच्या विद्यानिधी शाळेत शिवजयंती साजरी!

मुंबई: विद्यानिधी मराठी शाळेत १७ मार्च २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती इयत्ता ७वीच्या परिपाठा दरम्यान शाळेच्या तीनशे विद्यार्थ्यांनी दिमाखात साजरी केली. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कृतींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. म्हणूनच विद्यानिधी मराठी माध्यमिक शाळेमध्ये परीपाठ हे माध्यम वापरले जाते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगर शिक्षण मंडळाचे सदस्य दीपक कोतेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची विशेष माहिती सादर केली. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर अर्थपूर्ण नाटक सादर केले. शिवरायांची शौर्यगाथा सांगणारा वीरश्रीपूर्ण पोवाडा सादर केला गेला आणि सुंदर पारंपरिक नृत्य सादर केले. याप्रसंगी शिवाजी महाराजांवरील कवितांचे वाचन केले.

प्रमुख पाहुणे दीपक कोटेकर यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत शिव ललकारी पोवाडा गाऊन वातावरण निर्मिती केली. राष्ट्रप्रेमाच्या भावनेची अनुभूती घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.