मुंबई: मुंबई पश्चिम उपनगरातील विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर प्राथमिक विभागातील २० विद्यार्थ्यांना उपनगर शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य गोपाळ केळकर यांचे हस्ते खेळ, गायन, कथाकथन, संभाषण, नृत्य,वनाट्य व कला या प्रकारात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गोपाळ केळकर यांनी हितोपदेशी कथातून विद्यार्थ्यांना मूल्य व संस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संतोष टक्के उपस्थित होते.