‘सोनाटा’ने झिनियल्ससाठी सादर केली नवी ओळख आणि उत्पादन रेन्ज!

ठाणे: सोनाटा हा टायटन कंपनी लिमिटेडचा ब्रँड भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा घड्याळांचा ब्रँड, आपली संपूर्णपणे नवीन ओळख आणि नव्या उत्पादन रेन्जसह बाजारपेठेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. खासकरून शहरी आणि उपनगरी भागांमधील करियरची नुकतीच सुरुवात करत असलेल्या युवा व्यावसायिकांच्या वाढत्या सेगमेंटला आकर्षित करेल असा डिझाईनविषयीचा आधुनिक दृष्टिकोन प्रस्तुत करणे हा या नवीन ओळखीमागचा उद्देश आहे. सोनाटाचा नवीन, सुबक, आधुनिक लुक ब्रँडविषयीचे आकर्षण आणि उत्साह वृद्धिंगत करतो, आजच्या काळातील युवकांशी मिळतीजुळती, नवीन डायनामिक ओळख दर्शवतो.

उद्योगक्षेत्रातील अनुमानानुसार, भारतात २६० मिलियन झिलेनियल ग्राहक आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ ते ४ लाखांदरम्यान आहे. युवा मिलेनियल्स आणि वयस्कर जेन झेड यांच्या मधला दुवा असलेले झिलेनियल्स त्यांच्या अनोख्या महत्त्वाकांक्षा व मूल्यांसह अर्थकारणाला चालना देणारे प्रमुख घटक म्हणून उदयास येत आहेत. ही पिढी पारंपरिक नियमांना आव्हान देते आणि भविष्याचा आकार बदलू पाहत आहे. त्यांना स्वतःच्या यशोगाथा स्वतः लिहायची महत्त्वाकांक्षा आहे. एखाद्या ब्रँडचे उद्दिष्ट आणि व्हिजन याची त्यांना उत्तम जाण आहे. या माहितीच्या आधारे, सोनाटाने एक नवीन, ताजातवाना लुक आणि ओळख तयार केली आहे. या नवीन पिढीच्या विशिष्ट गरजा व प्राथमिकता पूर्ण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

ब्रँडच्या या नवीन प्रवासाबद्दल सोनाटाचे हेड ऑफ ब्रँड प्रतीक गुप्ता म्हणाले, “महत्त्वाकांक्षी स्वप्ने पाहणाऱ्या, आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारा, नवा सोनाटा ब्रँड प्रस्तुत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. युवा अपस्टार्ट्सना आम्ही अशी घड्याळे देऊ इच्छितो जी त्यांची व्यक्तिगत स्टाईल वाढवतील, इतकेच नव्हे तर, त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे प्रतीक बनतील. गुणवत्ता आणि स्टाईल यांना त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे आणि आमच्या नवीन डिझाइन्समध्ये या दोन्हींचा मिलाप आहे. सहज मिळवता येईल अशी शानदार स्टाईल आम्ही त्यांना देत आहोत. या पिढीच्या महत्त्वाकांक्षा व जीवनशैली यांना अनुरूप ब्रँड सोनाटा त्यांच्या प्रगतीमधील सहयोगी म्हणून त्यांच्यासोबत राहून त्यांच्या वाटचालीतील प्रत्येक टप्पा आणि प्रत्येक यश साजरे करत आहे.”

नवीन सोनाटामध्ये ४२ स्टाईल्सचे कलेक्शन असून त्यांची डिझाइन्स अतिशय आधुनिक आहेत. १,७२५/- रुपयांपासून पुढील किमतींच्या या घड्याळांचे रंग उठावदार व आकर्षक आहेत. अतिशय लक्षपूर्वक घडवलेले बारकावे आणि शानदार डायल्समुळे अपस्टार्ट्सना विविध सेटिंग्समध्ये त्यांची शैली अभिव्यक्त करता येईल. बोर्डरूम्सपासून सुट्टीच्या दिवशीच्या साहसी सहलींपर्यंत प्रत्येक वेळी ही घड्याळे त्यांचे पक्के साथीदार बनतील. सोनाटाची नवीन व्हिज्युअल ओळख सर्व बाजारपेठांमध्ये बिलबोर्ड्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ठळकपणे प्रदर्शित केली जाईल.

नवीन सोनाटा उत्पादन रेन्ज सर्व टायटन वर्ल्ड स्टोर्स, जनरल ट्रेड आणि अधिकृत डीलर्स, प्रमुख ई-कॉमर्स पोर्टल्सवर तसेच www.sonatawatches.in वर उपलब्ध असेल.