मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’, सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुपरहिट ‘सनई चौघडे’, मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ आणि मृण्मयी देशपांडे, धर्मेंद्र गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश दरक दिग्दर्शित ‘अनुराग’ हे चित्रपट ‘अल्ट्रा झकास’वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘शेंटीमेंटल’ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये सचिन तेंडुलकरच्या प्रेरक आयुष्याच्या छटा या यशस्वी होण्याच्या पाऊलवाटा आहेत. शेंटीमेंटल आणि सचिन अ बिलियन ड्रीम्स ओटीटीवर उपलब्ध होत आहे.
‘वेगवेगळ्या कथाबीजाचे वेगवेगळे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात आणि आम्ही त्या आवडींची पूर्तता नेहमीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीच्या माध्यमातून करत असतो. ‘शेंटीमेंटल’, ‘सनई चौघडे’, ‘अनुराग’ आणि’ सचिन अ बिलियन ड्रीम्स’ हे प्रतिभावान कलावंतांचे प्रभावी आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना अत्यानंद होत आहे.’ असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.