५ जानेवारी २०२६ ला होणार वर्ल्ड प्रीमियर
वसई: भारतातील अग्रगण्य एसयूव्ही निर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज XUV 7XO या आपल्या प्रीमियम एसयूव्ही श्रेणीतील आगामी महत्त्वाच्या सादर करत असलेल्या एसयूव्हीचे नाव जाहीर केले. केवळ चार वर्षांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत ३,००,००० पेक्षा जास्त जणांनी XUV700 एसयूव्ही खरेदी केल्यामुळे कंपनीने भारतातील एसयूव्ही विभागात जोरदार मुसंडी मारली. ज्यामुळे XUV700 एक गेमचेंजर ठरली त्या XUV700 च्या या समृद्ध परंपरेवर आधारित XUV 7XO त्या सर्व बाबींची उंची अधिक वाढवत नेत आहे.
प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारे डिझाईन आणि अभियांत्रिकी असलेल्या या एसयूव्हीमध्ये XUV700 च्या सिद्धहस्त सामर्थ्यासह उत्तम डिझाईन, तंत्रज्ञान, आराम आणि कामगिरी यांची जोड आहे. यामुळे केवळ काही बदल केलेली नाही तर खरोखरच अतुलनीय एसयूव्ही सादर केली जात आहे. प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रातील महिंद्राच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी डिझाइन केलेली XUV 7XO उद्याच्या एसयूव्हीसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक ठरण्यास सज्ज आहे.