मुंबई: जगभरात आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी ओळखले जाणारे ‘मॅन ऑफ मासेस’ एनटीआर (NTR) यांनी ‘केजीएफ’ (KGF), ‘सालार’ यांसारख्या सुपरहिट अॅक्शन ब्लॉकबस्टर्स देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत एकत्र येऊन ज्या चित्रपटावर काम सुरू केलं आहे – तो #NTRNeel प्रोजेक्ट याआधीच लॉन्च करण्यात आला होता आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील होती. या बहुप्रतीक्षित अॅक्शन थ्रिलरची शूटिंग वेगात सुरू आहे.
२० मेला एनटीआरचा (NTR) वाढदिवस असून चाहत्यांनी या दिवशी #NTRNeel बाबत एक मोठी अपडेट मिळेल अशी आशा बाळगली होती. मात्र निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, या दिवशी ‘वॉर 2’ चा बहुप्रतीक्षित अपडेट येणार असल्याने, त्यांनी #NTRNeel चे कंटेंट नंतरच्या शुभदिनी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे, “आम्हाला माहीत आहे की, तुम्ही या माणसाच्या वाढदिवसाची वाट किती आतुरतेने पाहत आहात… पण #WAR2 चं कंटेंट येत असल्यामुळे हा क्षण त्यांनाच देणे योग्य ठरेल…आणि #NTRNeel चा MASS MISSILE GLIMPSE आपण थोडं पुढे जाऊन देणार आहोत . या वर्षीचा वाढदिवस पूर्णतः समर्पित आहे #WAR2 ला आणि आपल्या NTR ला.”
प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा अॅक्शन-एपिक सिनेमा २५ जून २०२६ ला जगभरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि इतर भाषांमधून विविध प्रेक्षकवर्गांपर्यंत पोहचणार आहे. या चित्रपटात एनटीआर (NTR) एका शक्तिशाली भूमिकेत झळकणार असून, प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे. ‘एनटीआर नील’मध्ये (NTRNeel) अॅक्शन आणि कथानक यांचे स्फोटक मिश्रण पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरणार आहे.
प्रशांत नील यांच्या खास ‘मास व्हिजन’मुळे एनटीआरच्या स्क्रीनप्रेझेन्सला नवी उंची मिळणार आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स आणि एनटीआर आर्ट्स या नामवंत प्रोडक्शन हाऊसेसच्या सहकार्याने या चित्रपटातची भव्य निर्मिती सुरू आहे.
कलादिग्दर्शन (Production Design): चाळापथी
छायाचित्रण (DOP): भुवन गौडा
संगीत (Music): रवि बसरूर
निर्माते:कल्याण राम नंदामुरी, नवीन यर्नेनी, रवी शंकर यालमंचिली, हरीकृष्ण कोसराजू
प्रस्तुतकर्ते: गुलशन कुमार, भूषण कुमार व टी-सीरीज फिल्म्स
लेखक व दिग्दर्शक: प्रशांत नील