मुंबई: राज्यस्तरीय महामृत्युंजय पुरस्कार डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या ‘ना ते आपुले’ या नाटकाला जाहीर झाला आहे. हे विविध पुरस्कार दरवर्षी नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली या संस्थेतर्फे दिला जातो. गडचिरोली इथं येत्या ७ डिसेंबरला सकाळी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पूर्वी मुंबईच्या ‘आशिर्वाद रौप्यमहोत्सवी पुरस्कार’ या पुरस्काराने विजय देशमुख यांच्या नाटकाला गौरवण्यात आले आहे. डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या आजवर प्रकाशित आणि मंचित झालेल्या तीनही नाटकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘ना ते आपुले’ हे नाटक ग्रंथालीने प्रकाशित केले आहे.