डोंबिवली: निर्माते व प्रमुख कलावंत शशिकांत गांगण यांचा ‘पेन किलर’ हा लघुचित्रपट ७ नोव्हेंबरला वरदविजन एन्टरटेन्मेन्टच्या युट्युब चॅनेलवर रात्री ८:०० वाजता झळकणार आहे. दसऱ्याच्या दिवशी या लघुपटाचा मुहुर्त करुन तो विक्रमी वेळेत पूर्णत्वाला नेण्यात शशिकांत गांगण व त्यांच्या टीमला यश आले आहे. विपरीत आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या एका गरीब लेखकाच्या संघर्षाची कहाणी यात वर्णिली आहे.
दिनेश रुके यांनी पेन किलर लघुपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिले असून कृष्णा देडे, एम नटराज यांना दिग्दर्शनासाठी सोहन कांबळे यांनी सहकार्य केले आहे. कार्यकारी निर्माते म्हणून अविनाश नामजोशी व सोहन कांबळे यांनी जबाबदारी सांभाळली आहे; तर डोंबिवली भागातच पेन किलरचे बहुतांश चित्रीकरण संतोष हंकारे यांनी पूर्ण केले आहे शशिकांत गांगण यांच्यासमवेत नायिका म्हणून प्रिती वानखेडे तर अन्य भूमिकांमध्ये एम नटराज, आशिष सातपुते, कृष्णा देडे, सोहन कांबळे, अविनाश नामजोशी हेही दिसणार आहेत. आगामी काळात आपण विनोदी तसेच विविध भयपटसुध्दा निर्माण करु असे गांगण यांनी यावेळी सांगितले.