विद्यानिधी विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गरबा नृत्य प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने सन्मानित

मुंबई: विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या कलागुर्जरी आयोजित रास, गरबा नृत्य स्पर्धेत उपनगर शिक्षण मंडळ संचालित डी.पी इंग्रजी प्राथमिक विभागाने सादर केलेल्या गरबा नृत्याला प्रथम क्रमांकाचे तर श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गरबा नृत्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कलागुर्जरी संस्थेचे अध्यक्ष हेमांग जांगला व सचिव प्रणव भगत यांचे हस्ते विजेत्या गटास चषक, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सदर दोन्ही नृत्याचे नृत्य दिग्दर्शन बसवराज गुरव यांनी केले होते.