रंगभूमी कलेचा धंदा करणाऱ्यांना नैतिकतेची जाण हवी – प्रा. देवदत्त पाठक

पुणे: जागतिक रंगभूमी दिनानिमित्त २७ मार्चला होणाऱ्या जगातील नाट्य सोहळ्याचे संदेश पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून विलेम डोफे अमेरिकन अॅक्टर आणि थिएटर संस्थापक यांनी नाटकाचा व्यवसाय करणाऱ्यांनी सवंग मनोरंजनातून लोकांना अशांत करणे ,संतापायला लावून, वासना चाळवून प्रेक्षकांची दिशाभूल करणे बंद करावे आणि त्यापेक्षा फक्त आणि फक्त सुसंवाद शांतता आणि एकमेकांबद्दलची असलेली आस्था याला जागृत करण्यासाठी नाट्य कला व्यवसाय करावा असे म्हटले आहे. त्यालाच अनुसरून ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ प्रा.देवदत्त पाठक यांनी नाट्य व्यवसाय करणाऱ्यांनी धंदे पण सोडावं आणि नैतिकतेची चाड ठेवून कला सर्वदूर पोचवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आर्थिक आणि धेडगुजरे व्यापार बंद करावेत, असे आवाहन केले आहे.नाट्यकलेतील प्रशिक्षण, प्रयोग, प्रकाशन आणि संशोधन याचा योग्य अभ्यास करून सर्वांपर्यंत त्याचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केले आहे.

रंगभूमी कलेचा जन्म हा मनाची शांतता, विचार प्रवर्तकता निर्माण करण्यासाठी आहे, ते सोडून इतरच धंदेवाईक सौदा करणाऱ्यांनी या अशा प्रकारच्या रंगभूमी कलेच्या व्यवसायातून स्वतः हून बाहेर पडावे आणि रंगभूमी कला क्षेत्रातील बजबजपुरी बंद करावी आणि विशुद्धता जपावी अशा कान पिचक्या प्रा.देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने विलेम डोफे यांचा नाट्य संदेशाला अनुसरून दिल्याआहेत. याप्रसंगी ग्रेट थोर नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या वास्तूच्या मातीचे अभिवादन करून सर्वांनी पूजन केले, डुंगु आणि पुंगू आणि जागतिक महिला दिन साजरा या दोन नाट्यप्रयोगाचे सादरीकारण गुरूस्कूल गुफान या संस्थेच्या वतीने सादर करण्यात आले.

यावेळी रोटीरी क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता जेरे हेमंत जेरे, डॉ.अनिता मोहिते, कल्पना बलगाडे हाबाडे, अनंतकलाचे अध्यक्ष मुकुंद आणि मानसी करंदीकर आणि सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे आणि रंगभूमीबाबत आत्मीयता असलेल्या प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. गौरी बनसुडे ,धनश्री गवस, अर्णव देशपांडे, मल्हार बनसुडे, समीर बनसुडे, जया ताई बनसुडे, ऋतुजा केळकर, मिलिंद केळकर यांनी जागतिक रंगभूमी दिन संपन्न करण्यासाठी सहकार्य केले.