मुंबई: नागपंचमीचा शुभ मुहूर्त व विद्यानिधीचे आद्य संस्थापक माननीय स्वर्गीय श्रीराम मंत्री यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर साधना मोढयांच्या पाठिंबांनी ३० जुलै २०२५ ला विद्यानिधी मराठी माध्यम शाळा, कमला रहेजा ज्युनियर कॉमर्स कॉलेज आणि मुंबईतील सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र महाविद्यालय, कमला रहेजा विद्यानिधी आर्किटेक्चर कॉलेज (केआरव्हीआयए) येथील विद्यार्थी आणि प्राध्यापक श्वेता मॅम यांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण उपक्रम राबवला. कॉमर्स कॉलेजच्या प्राध्यापिका संगीता तिवारी यांनी तुळस, कोरफड आणि निंब यासह ७० औषधी वृक्ष उपलब्ध करून दिले. या छोट्या पण प्रभावी कृतीने जैवविविधता वाढवण्यासह हवामान बदलाला सामोरे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
नागपंचमीच्या सांस्कृतिक मूळांशी जोडलेला या उपक्रमाने निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश दिला.अशा तर्हेने विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून वसुंधरेच्या हिरव्या भविष्यासाठी सामुदायिक प्रयत्नांचे महत्त्व दाखवले.