मुंबई: विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम हायस्कूलने सकाळी ८ वाजता माधुरीबेन वसा हॉल येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रख्यात प्रज्ञा व शिष्यवृत्ती परीक्षा प्रशिक्षक राजाराम पवार आणि विद्यानिधीच्या माजी शिक्षिका अत्तर दे उपस्थित होते.
या वर्षी अहिल्याबाई होळकर यांची ३५०वी जयंती व गुरुपौर्णिमा असे दुहेरी औचित्य साधून, विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य, डिजिटल क्विझ आणि भाषणांच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुणे राजाराम पवार सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “चुका करा आणि त्या चुकांमधून शिका, हेच यशाचे खरे मार्ग आहे.” त्यांच्या या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला.
विद्यानिधीच्या परंपरेनुसार, विद्यार्थ्यांनी ‘समर्पण निधी’ हा समर्पण कलशात अर्पण केला. हा निधी सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना दान केला जाणार आहे.या कार्यक्रमाने विद्यानिधीच्या सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.