विद्यानिधीचे कला शिक्षक नितीन गोरुले यांचा दिल्लीपर्यंत डंका…

मुंबई:विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील कला शिक्षक नितीन गोरुले यांचा दिल्लीपर्यंत डंका पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील राजभवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर भाष्य करणाऱ्या ७५ चित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील कला शिक्षक नितीन गोरुले यांच्या २ चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनात देशातील ३५हून अधिक चित्रकारांनी सहभाग नोंदवला आहे. हे चित्र प्रदर्शन टप्याटप्याने संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्यात प्रदर्शित होणार आहे.नितीन गोरुले यांचे उपनगर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि समाज माध्यमातून कौतुक होत आहे.