मुंबई:भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट योगदानासाठी वाघ बकरी चहा समूहाला हुरुन इंडियातर्फे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या “जनरेशनल लेगसी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हुरुन इंडियाकडून कौटुंबिक व्यवसाय श्रेणीत प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार वाघ बकरी चहा समूहाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योगदान आणि चहा उद्योगातील त्यांचा शाश्वत वारसा याचे द्योतक आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई, कार्यकारी संचालक पारस देसाई, संचालक विदिशा पराग देसाई आणि प्रियम परीख यांनी प्रतिनिधित्व केलेल्या देसाई कुटुंबाने हुरुन इंडियाचे संस्थापक अनस रहमान जुनैद आणि बार्कलेज प्रायव्हेट क्लायंटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन सिंघ यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. समारंभ गुरुवारी २४ ऑक्टोबर २०२४ ला आयोजित करण्यात आला होता.
हा पुरस्कार वाघ बकरी चहा समूहाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वाढते अस्तित्व अधोरेखित करतो. आजच्या घडीला ६० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनांसह, हा समूह वेगाने विस्तारत असलेला राष्ट्रीय ब्रँड म्हणून भारतात आपले स्थान भक्कम त्याचवेळी एक प्राधान्य पसंतीचा आंतरराष्ट्रीय चहा ब्रँड म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.