ठाणे: टाटा उद्योग समुहातील वेस्टसाईडने मिरा-भाईंदर येथे नवे स्टोअर सुरु केले आहे. वेस्टसाईडचे हे देशातले २२८ वे स्टोअर आहे. फॅशनबाबत विशेष चोखंदळ असलेल्या ग्राहकांसाठी लीना इम्पेरियल रेसिडेन्सी, १५० फीट रोड, डी मार्टजवळ, लँडमार्क-मॅक्सस मॉल, भायंदर पश्चिम येथे सुरु करण्यात आलेले हे स्टोअर तब्बल २२ हजार २७४ चौरस फुटांचे आहे.
वेस्टसाईडच्या नवीन स्टोअरमध्ये कपडे, ऍक्सेसरीज, कॉस्मेटिक्स आणि फूटवेयरचे वेस्टसाईडचे जवळपास सर्व ब्रँड एकाच ठिकाणी सहजपणे खरेदी करता येतील. फॅशनच्या आधुनिक ट्रेंड्सचा लाभ माफक किमतीत ग्राहकांना यामुळे उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना मनोसोक्तपणे खरेदी करता यावी, यासाठी स्टोअर मध्ये सर्व उत्पादने सोयीस्कर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहेत. फॅशनेबल कपड्यांचे कलेक्शन दर तीन आठवड्यांनी शुक्रवारी रिफ्रेश केले जाते.
वेस्टसाईडमध्ये भारतीय तसेच वेस्टर्न पध्दतीचे कपडे उपलब्ध आहेत. उत्सव कलेक्शन, वेळ प्रसंगानुसार घालता येणारे कपडे, दररोजचा एथनिक वॉर्डरोब असे हरतऱ्हेचे कपडे याठिकाणी मिळू शकतात. ‘बॉम्बे पेसले’ मध्ये समकालीन, सर्जनशील, मुक्तपणा दर्शवणारे, फ्युजन कपडे आहेत. ‘वर्क’ हे कोऑर्डीनेटेड एथनिक वेयर आहे. तर ‘झुबा’ प्रीमियम डे-वेयर आहे. पार्टी-ग्लॅम आणि फॅशनची आवड असलेल्या तरुणींसाठी ‘न्यूऑन’चे कलेक्शन आहे. स्मार्ट व फेमिनाईन कॅज्युअल साठी ‘एल ओ व्ही’ खरेदी करता येईल. कर्व्ही महिलांसाठी आरामदायी, स्मार्ट, कॅज्युअल कपडे ‘जिया’ मध्ये आहेत. ९ टू ९ फॅशनसाठी वॉर्डरोब हे वर्कवेयर स्टायलिश, सोफिस्टिकेटेड आणि आत्मविश्वास मिळवून देणारे आहे.
वेस्टसाईडने पुरुष ग्राहकांचीही काळजी घेतली आहे. ‘डब्ल्यूईएस’ मध्ये वर्क टू विकेंड रेन्ज तर :न्यूऑन मेन’ हे मिलेनियल्स साठी विचारपूर्वक बनवण्यात आलेले स्ट्रीट-वेअर कलेक्शन आहे. एथनिक टच असलेले रिलॅक्स्ड अर्बन वेयर हवे असेल तर ‘ई.टी.ए.’ मध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘स्टुडिओ वेस्ट’मध्ये पुरुषांसाठी सौंदर्य उत्पादनांची रेलचेल आहे. कॉस्मेटिक्स, फाईन फ्रॅग्रन्स व मिस्ट, बाथ अँड बॉडी उत्पादने यांची विशाल श्रेणी आहे. किड्स वेयरमध्ये फॅशन व उपयुक्तता यांचा संगम आहे. फूटवेयर कलेक्शन देखील आकर्षक असे आहे. कॅज्युअल स्नीकर्स, शानदार हील्स, स्टर्डी बूट्स आणि स्पोर्टी सँडल्स यांच्यापैकी ग्राहक त्यांच्या पसंतीचे फुटवेअर खरेदी करू शकतो.