वैद्यकशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये काम करताना सर्वांनी वर्तन भान ठेवायला हवं… – डॉ. संजय मेहंदळे

पुणे: रेज ऑफ होप स्वाधारच्या द्वि दशकपूर्तीच्या निमित्ताने डॉ. संजय मेहेंदळे संचालक संशोधक हिंदुजा हॉस्पिटल मुंबई यांनी विचार व्यक्त केले की, ‘खरंतर समाजशास्त्र आणि वैद्यकशास्त्र हे एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. पण यामध्ये वर्तनाचे भान याची कमतरता असल्यामुळे त्याचा समाज घटकांवरती पुरेसा सकारात्मक प्रभाव पडत नाही, याची विशेष काळजी समाज आणि वैद्यकशास्त्रात काम करणाऱ्यांनी घेतली पाहिजे.’

वीस वर्षे रेज ऑफ होप या प्रकल्पाला पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी उपाध्यक्ष सुनंदा टिल्लू यांनी आपल्या मनोगतामध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावरती केलेली मात यावर विशेष लक्ष केंद्रित केले, अडचणी येणारच पण त्यावर मात करणे ही तर खरी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची कर्तव्य आहे. जी स्वाधार संस्थेच्या संस्थापक मीनाक्षी आपटे यांनी कशा पद्धतीने उपाय योजना करावी याचे बीज २५ वर्षांपूर्वी रुजवले , तोच वसा आम्ही पुढे चालवत आहोत असेही त्यानिमित्ताने म्हणाल्या. या निमित्ताने रेज ऑफ होप च्या कार्यकर्त्या उषा देशपांडे, आशा सगर, ज्योती जगताप, मंगल बागल, अनन्या नवार यांचा स्वाधारच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

संस्थेच्या अध्यक्षा अंजली बापट यांनी एखादा प्रकल्प सातत्याने राबवणे ही प्रयत्नांची पराकाष्ठा असते, तो रुजवताना,त्याला योग्य पद्धतीचे वातावरण व खतपाणी घालणेआणि सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांचे पाठबळ सातत्याने मिळवणे तितकेच महत्त्वाचे आहे ,ते यानिमित्ताने आम्ही निर्माण केले आणि प्रकल्पाच्या निमित्ताने सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अथक आमच्या कार्यकर्त्यांनी ते परिश्रम केले. त्यामुळेच हा प्रकल्प वाढीस लागला आहे,याचा आम्हाला अभिमान आहे असे त्या म्हणाल्या. समाज आणि वैद्यकशास्त्रातील अनेक मान्यवर या निमित्ताने उपस्थित होते.स्नेहा बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले तर अनन्या नवा यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.