मुंबई:’लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याच्या घरावर संकटं येत असल्याने दादा व्रत करण्याचा निर्णय घेतो. मात्र, संपूर्ण गावाला हे व्रत नको आहे. गावकऱ्यांचा विरोध असूनही, दादा आपल्या निर्णयावर ठाम आहे. तुळजाही बहिणींना धीर देते आणि त्यांना आधार देते. वडिल्यांच्या हट्टाखातर जिम सिन्ना धनूसोबत लग्न करण्यास तयार झालाय. लग्नाच्या विधी सुरू होतात, पण जिम सिन्ना अजिबात आनंदी नाहीये. दुसरीकडे, तुळजा सूर्याच्या आईसाठी म्हणजेच आशासाठी वकील उपलब्ध करून देते आणि त्यामुळे आशाला पॅरोलवर मुक्तता मिळते. आशा घरी येते आणि नकळत सर्व विधी तिच्या हातून पूर्ण होतात. दरम्यान, शत्रू सूर्याला आपली चूक कबूल करून विश्वास मिळवण्यासाठी गुलामासारखे काम करवून घेतोय. जालिंदर असहाय्य आहे. सूर्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. लग्नानंतर, धनू, जिम सिन्नाच्या घरी जाते. पहिल्याच रात्री जिम सिन्ना आपलं सत्य तिच्यासमोर उघड करणार आहे. धनू ते ऐकून हादरते. हे कटू सत्य स्वीकारून धनु त्याच्यासोबत सगळं निभावून न्यायचा निर्धार करते. तर इकडे शत्रू तेजुला न सांगता मंजुळाला भेटायला जातो.
काय होईल जेव्हा तेजुला हे सत्य कळेल? धनू जिम सिन्नाला स्वीकारू शकेल ? आणि गावकऱ्यांचा पुढचा डाव काय असेल? यासाठी बघायला विसरू नका ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज संध्याकाळी ६:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.