पुणे: जागतिक बाल रंगभूमी दिन हा २०मार्चला जगातल्या जवळजवळ २०० देशांमध्ये साजरा होणारा…पुण्यातही गुरुस्कूल गुफानच्या वतीने प्रा.देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘ॲक्टर व्हायचे तुला’ या बाल कुमार आणि किशोर नाटकाचा प्रयोग हाउसफुल गर्दीत साजरा झाला. मुलांना नाट्यगृहाकडे न्या ,सजीव कलेचा अनुभव द्या, त्या सजीव अनुभवातून मुलांच्या मन, बुद्धी, शरीर याला साद प्रतिसादाची साथ मिळेल,या हेतूने मुलांचे वागणे बोलणे आणि उत्स्फूर्तता याची सांगड घालता येईल यासाठी म्हणून बाल रंगभूमी दिन साजरा होतो, ‘ॲक्टर व्हायचंय तुला’ या नवीन हटके विषयावरचा अर्थात अभिनयाचं प्रशिक्षण देणारा नाट्य अनुभव म्हणून याकडे बघता येईल.
रंगभूमीवर प्रथमच अभिनयाचे प्रशिक्षण देणारे हे नाटक म्हणून या नाटकाकडे बघता येईल.अनेक कला संस्था शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून हा प्रयोग सर्व दूर पोहोचत आहे अभिनय कलेकडे रील आणि तात्पुरती गंमत म्हणून न बघता एक अभ्यास म्हणून त्याच्याकडे बघावे आणि त्यातून आपले स्वतःचे करिअर बनवावे हे समजून सांगणारा प्रबोधक आणि मनोरंजक असा हा नाटकाचा प्रयोग सर्वांनी आवर्जून बघावा, असे या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते उदय लागू यांनी सांगितले. रंगमंच खेळांच्या माध्यमातून उलगडत जाणारे या नाटकाचे कथासूत्र शेवटी रंगभूमी केलेला टाइमपास म्हणून न बघता एक ध्यास म्हणून त्याच्याकडे बघावे आणि त्याबद्दलची तयारी करावी असे या निमित्ताने ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांनी सांगितले. ‘ॲक्टर व्हायचंय तुला’ नाटकाचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मिलिंद केळकर यांनी महत्त्वाची जबाबदारी बजावली आहे. तसेच गौरी पत्की ,अक्षदा वाघवसे ,धनश्री गवस ,मल्हार बनसु डे,अर्णव देशपांडे यांनी अभिनय सहभाग घेतला. तंत्र सहाय्य आलोक जोगदंनकर,अथर्व जाधव उषा देशपांडे,सीमा जोगदनकर,दर्शन पोळ, गौरी बनसुडे,अक्षता जोगदनकर यांनी केले आहे. बालरंगभूमीला दुर्लक्षित करू नका ती तर प्रौढ रंगभूमीचा पाया आहे, असे विचार या निमित्ताने प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी मांडले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रयोग पार पडला.