बाप्पाच्या चरणी, ढोल-ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ!
मुंबई: महाराष्ट्रातील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनलेली झी मराठी, घेऊन येत आहे वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स’२०२५!या वर्षाची थीम आहे “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”, ज्यात प्रेक्षक आणि कलाकार यांचं खास नातं साजरं होताना दिसणार आहे. या अवॉर्ड् सोहळ्याच्या ‘मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ’, अत्यंत पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, ढोल-ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा शुभारंभ पार पडला. हा सोहळा झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जयंत- वेंकी (लक्ष्मी निवास), कमळी-ऋषी (कमळी), अंबिका-अथर्व (‘तुला जपणार आहे) यांनी गणपती बाप्पाची आरती करत आपल्याला आणि आपल्या मालिकेला विजयी करण्यासाठी आशीर्वाद घेतले.
कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ही केवळ स्पर्धा नसून, प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील प्रेमाचं एक सुंदर प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केलं. मतदानाची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर मत पत्रिकेद्वारे पार पडणार आहे त्यासोबतच झी५ अॅपवर ही प्रेक्षक मतदान करू शकणार आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार, मालिकेला ज्यांनी त्यांचं मन जिंकलंय, त्यांना विजयी करण्याची संधी मिळवून देणार आहे.
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक अवॉर्ड शो नसून महाराष्ट्रातील संस्कृती, कुटुंबातील नाती आणि प्रेक्षकांच्या भावनांचा एक भव्य उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या मतांनी घडवा तुमच्या लाडक्या कलाकारांचा सनमराठीव
तेव्हा पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड २०२५ लवकरच सदैव तुमच्या झी मराठीवर.