जीवनसाथीडॉटकॉमने जोडप्याला लग्नात दिले सरप्राईज

भारतीय विवाहाच्या इतिहासात पहिल्यांदाच जीवनसाथीडॉटकॉम या देशातील आघाडीच्या मॅट्रिमोनी ब्रँडने जीवनसाथी जोडप्यांसाठी त्यांच्या लग्नात एक प्रकारचे सरप्राईज आयोजित केले. स्ट्रिंग ऑफ लव्ह बायजेएस या मोहिमेचा एक भाग म्हणून जीवनसाथीने ‘दिन शनगा दा’ आणि ‘रांझा’ फेम गायिका-गीतकार जसलीन रॉयल यांच्याशी करार केला. त्यांनी मूळचे इंदूरचे असलेल्या भाग्यवान वधू आणि कुटुंबाला लग्नात अचानक एक सुंदर परफॉर्मन्स दिला. जीवनसाथी डॉटकॉमने वधूला लग्नातील पाहुणे आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपले रहस्य उघड न करता हा मोठा आनंदाचा धक्का दिला.

जसलीनने वरमालानंतर लगेचच वधूला आश्चर्यचकित केले आणि उपस्थित सर्वांना थक्क केले. वधू आणि तिच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया जीवनसाथी टीमने सुंदरपणे टिपल्या. टीमने स्वतःला इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी बनवत सर्व तयारी पूर्ण झाली आहेना याची गुपचूपपणे खात्री केली.

जीवनसाथीडॉटकॉमच्या ईव्हीपी आणि मार्केटिंग प्रमुख हिमानी बहुगुणा म्हणाल्या, ‘ आमच्या व्यासपीठावरील ही एक सुंदर प्रेमकहाणी आहे. जसलीन रॉयलने लाइव्ह परफॉर्मन्स करून त्यांच्या खास दिवस अधिक संस्मरणीय बनवला. लग्न हे खरे लग्न असल्याने, या आश्चर्याची आखणे अजिबात सोपे नव्हते, परंतु ती नियोजनबद्ध आखणीने यशस्वी केली. आम्ही जसलीनचे तिच्या अप्रतिम कामगिरीबद्दल तर वराचे ही आभार मानू इच्छितो, की त्यांनी आम्हाला ही योजना पूर्ण करण्यात मदत केली. या योजनेच्या यशस्वीतेने जीवनसाथी जोडप्यांसाठी त्यांच्या जीवनात अतिरिक्त प्रेम आणि हसू आणण्यासाठी आम्ही असे आणखी अनोखे उपक्रम घेऊन येत राहू याची आम्हाला खात्री आहे.’