मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेद्वारे ‘राज्यस्तरीय लेखन स्पर्धा २०२३’

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या पदव्युत्तर पदविका मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने मराठी भाषा दिवस आणि महिला दिनानिमित्त ‘राज्यस्तरीय लेखन स्पर्धा २०२३ ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निःशुल्क आहे. लेख पाठवण्याची अंतिम दिनांक ५ मार्च २०२३ आहे. लेख [email protected] या इमेलवर पाठवावे.

स्पर्धेसाठी नोंदणी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScGwwJwDou4u6H7GTj7Eumjtw6WtbcvUh4E6GLSlpLiQfj32g/viewform या लिंकवर करता येईल. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी स्पर्धकांना पुस्तक स्वरूपात बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या तीन जणांना ही पुस्तके पारितोषिक स्वरूपात भेट म्हणून दिली जाणार आहेत.

‘राज्यस्तरीय लेखन स्पर्धा २०२३’ स्पर्धेचे विषय…
१)स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : काय सरले ,काय उरले?
२)भारत एक महासत्ता : स्वप्न आणि वास्तव
३)समाज माध्यमांच्या प्रभावामुळे वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या यांच्या भाषेत झालेले बदल.
४)मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा – गरज आणि अडथळे
५) समाजातील आदर्श व्यक्तींना जातीय चौकटींमध्ये बांधणे कितपत योग्य?
६)हरवत चाललेला कौटुंबिक संवाद
७)महिला सक्षमीकरण ध्येयपूर्ती – एक अडथळ्यांची शर्यत.

स्पर्धेच्या विजेत्यांना ख्यातनाम युद्ध पत्रकार दि. वि. गोखले यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या वर्गाच्या पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक प्रदान केले जाईल.