भारतातील पहिल्या मॉडेल जी २० चं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपद्वारे आयोजन !

मुंबई : भारतातील पहिल्या मॉडेल जी २० चं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपद्वारे आयोजन करण्यात आलं आहे. मॉडेल जी २० ची शिखर परिषद ३० आणि ३१ जानेवारी २०२३ ला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारताचे जी २० शेर्पा अमिताभ कांत मॉडेल जी २० शिखर परिषदेचं उद्घघान करतील आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उद्घघाटनाचे अध्यक्षस्थान भूषवतील. या कार्यक्रमात देशभरातून तरुण सहभागी होणार आहेत.

भारतानं जी २० चं अध्यक्षपद स्वीकारलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भारतात होणाऱ्या जी २० मध्ये सी २० सचिवालयाचे प्रमुख असतील. भारताचं अध्यक्षपद साजरे करण्यासाठी आणि जी २० हे सत्तेच्या कॉरिडॉरपर्यंत मर्यादित तरुणांपर्यंत नेण्यासाठी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप भारतातील पहिल्या मॉडेल जी २० चं आयोजन करत आहे.

‘भारताच्या प्रतिष्ठित जी २० चं अध्यक्षपद भूषवण ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप शिष्टमंडळानं भारताचं पहिलं मॉडेल जी २० चं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आम्हाला आनंद आहे.’ असं मॉडेल जी २० चे संचालक देवेंद्र पै यांनी सांगितलं.

‘मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट’ (MILM) अंतर्गत भारतातील पहिल्या ‘मॉडेल जी-२०’चे आयोजन करण्यात येत असून मॉडेल जी-२० हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांसाठी एक व्यासपीठ आहे. ‘जागतिक भागीदारी:संधी आणि आव्हानं’ या थीम अंतर्गत कार्यक्रमाचं एकूण तीन ट्रॅक असून त्यात मुख्य ट्रॅक(G20), फायनान्स ट्रॅक(F20) आणि सिव्हिल सोसायटी ट्रॅक(C20) असतील.