मुंबई : रायगड किल्ल्यामधून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योतीच्या रॅलीला आज शुभारंभ करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले रायगडवरून निघालेली क्रीडा ज्योत आज पुण्याच्या एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात महा ज्योतीचं आगमन झालं. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ऑलम्पियन खेळाडू अजित लाकरा यांना सोपवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
किल्ले रायगड इथल्या मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित सोहळ्याला महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद महाड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.
मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती उद्या एकत्रित येऊन ऐतिहासिक पुणे उजळून निघणार आहे. ही क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पोहोचणार आहे.