कृषी विद्यापीठे

महाराष्ट्र राज्यात ४ कृषी विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठातून कृषी विषयक पदवी आणि पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात.

कृषी विषयक प्रशिक्षण आणि संशोधन देण्याचे काम कृषी विद्यापीठात केले जाते. महाराष्ट्र राज्यात ४ कृषी विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठातून कृषी विषयक पदवी आणि पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. शेती विषयक विविध बाबींचे संशोधनही केले जाते.

  • महाराष्ट्रामधील कृषी विद्यापीठे…
  1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ( स्थापना १९६८ )
    स्थळ – राहुरी, जि. अहमदनगर
    प्रमुख संशोधन विषय – ऊस, ज्वारी, गहू, इत्यादी

  2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ( स्थापना १९६९ )
    स्थळ – अकोला व नागपूर येथे दुसरा कँपस आहे.
    प्रमुख संशोधन विषय – कापूस, गहू, डाळी, तेलबिया इत्यादी

  3. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ( स्थापना १९७२ )
    स्थळ – दापोली, जिल्हा- रत्नागिरी.
    प्रमुख संशोधन विषय – तांदूळ, नागली, फलोत्पादन, खारभूमी इत्यादी

  4. मराठवाडा कृषी विद्यापीठ ( स्थापना १९७२ )
    स्थळ – परभणी
    प्रमुख संशोधन विषय – ऊस, कापूस गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया,  रेशीम विकास इत्यादी

कृषी विद्यापीठाची शिक्षण विषयक उदिष्ट्ये :

  1. पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम राबविणे.
  2. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी पदवीधर निर्माण करणे.
  3. पदवीधरांमध्ये उद्योजकता आणि  स्वयंरोजगारासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.
  4. ग्रामीण विकासासाठी आणि  शाश्वत पर्यावरण निर्मितीसाठी योग्य नेतृत्वगुण असलेले पदवीधर निर्माण करणे. 
  5. महिला सबलीकरण आणि कृषी क्षेत्रातील महिलांच्या सहभागाविषयी जागृती निर्माण करणे.

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, अभियांत्रिकी, अन्न, तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन, गृहविज्ञान, मस्यविज्ञान या शाखांचा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान १२वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र ज्ञान आयोग मर्यादित (MKCL) यांच्या सहकार्याने प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.