मुंबई : शॉपिफाय या वाणिज्यासाठी अत्यावश्यक इंटरनेट पायाभूत सुविधा प्रदाता कंपनीने आज पुनर्कल्पना केलेला पार्टनर प्रोग्राम लॉन्च केला आहे, ज्यामधून शॉपिफाय विकासाच्या पुढील युगामध्ये प्रवेश करत असताना भारतातील सहयोगींसाठी बहु-वार्षिक दृष्टीकोनाची सुरूवात झाली आहे. दशकापूर्वी शॉपिफाय पार्टनर प्रोग्रामची सुरूवात झाल्यापासून शॉपिफायचे सहयोगी नेटवर्क जगातील सर्वात मोठे वाणिज्य परिसंस्था बनले आहे, जिथे प्रबळ समुदाय व्यापाऱ्यांना जलदपणे विकसित होण्यास मदत करत आहे. शॉपिफायचे आता एकट्या भारतात ३,३०० हून अधिक सहयोगी आहेत.
प्रत्येक सहयोगीला शॉपिफायसह त्यांचा व्यवसाय सुलभपणे करण्यास मदत करण्यासाठी अपवादात्मक रिवॉर्ड्स, कौशल्य निर्मिती आणि सुलभ, सर्वसमावेशक सहयोगी अनुभव या तीन क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शॉपिफाय येथील मुख्य महसूल अधिकारी बॉबी मॉरिसन म्हणाले, ‘आमचे सहयोगी शॉपिफाय आणि आमच्या व्यापाऱ्यांना अद्वितीय मूल्य देतात. त्यांच्या ऑफरिंग्ज ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक संभाव्य सहभागामध्ये सहयोगींना समाविष्ट करण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या सहयोगी परिसंस्थेत आमच्या सातत्यपूर्ण गुंतवणूकीमागे एकच ध्येय आहे, ते म्हणजे आमच्या सहयोगींना त्यांनी आम्हाला सांगितलेल्या त्यांच्या गरजेच्या आधारावर अधिक व्यवसाय प्राप्त करण्यास मदत करणे.’
शॉपिफाय येथील पार्टनरशिप्सच्या(इंडिया) प्रमुख अप्सरा चिदंबरम म्हणाल्या, ‘भारतातील प्रयत्नशील सहयोगी परिसंस्था अद्वितीय आहे आणि जागतिक मंचावर भारतीय वाणिज्याच्या यशासाठी महत्त्वाची आहे. शॉपिफायच्या पुनर्कल्पना केलेल्या पार्टनर प्रोग्राममधून सहयोगींना त्यांच्या स्वत:च्या व्यवसायाला चालना देण्याकरिता अद्वितीय संधी देण्याप्रती आमची कटिबद्धता, तसेच शॉपिफायसह भारतीय ब्रॅण्ड्स आणि रिटेलर्सचे यश दिसून येते. मी आमच्या व्यापाऱ्यांसाठी स्थानिक सहयोगी निर्माण करत राहणारा अविश्वसनीय अनुभव पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.’