आयवूमीचा आरोग्य आणि फिटनेस प्रोत्साहनासाठी उपक्रम

पुणे : इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या बनवणारी भारतीय कंपनी आयवूमीने ईव्ही पार्टनर म्हणून नुकताच महामॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी महामॅरेथॉन संपन्न झाली. परिवर्तनामध्ये सहभागी होऊन कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले होते. महामॅरेथॉनमध्ये विविध क्षेत्रातील धावपटू सहभागी होतात. सिन्सियर प्रोफेशनल्स, एलिट रनर्स, हाफ मॅरेथॉनर्स, धावण्याचा उत्साह असलेले, धावणे हा ज्यांचा छंद आहे असे, आरोग्यप्रेमी, कुटुंबासह धावणारे आणि इतर सर्व जे समानता, प्रेरणा, आरोग्य, फिटनेस आणि जिकंण्याच्या आनंदासाठी ट्रॅकवर येण्यास उत्सुक असतात, अशा सर्वांचा महामॅरेथॉनमध्ये सहभाग असतो.

आयवूमीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन भंडारी यांनी सांगितले, ‘भारत इलेक्ट्रिक गाड्यांचा हॉटस्पॉट बनला आहे, देशात ऑटो उद्योगक्षेत्रात खूप मोठे आणि आदर्श परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणानुकूल, शाश्वत ऊर्जा निर्माण करणारी आणि हरित क्रांतीमध्ये योगदान देणारी एक कंपनी म्हणून आयवूमी महामॅरेथॉनसारख्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देते. ईव्ही गाड्यांचा स्वीकार करणे ग्राहकांसाठी अजून जास्त सहजसोपे बनावे, यासाठी आम्ही १.३८ कोटी रुपयांचे लाभ वाटले आहेत. पुढील पिढ्यांसाठी अधिक आरोग्यदायी आणि हरित भविष्य निर्माण करणे आमचे उद्दिष्ट आहे. स्वतःला बदलत्या भारताचा नवा चेहरा म्हणून सिद्ध करण्याच्या दिशेने आम्ही रोज व सतत करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.’

महामॅरेथॉनच्या समर्थनार्थ, आयवूमीने यामध्ये भाग घेणाऱ्यांना २,५०० रुपयांची ५,००० कुपन्स आणि महामॅरेथॉनच्या विजेत्यांना १०,००० रुपयांची १३० कुपन्स देखील वाटली, ज्यांचे एकूण मूल्य १.३८ कोटी रुपये आहे. २,५०० आणि १०,००० ही दोन्ही कुपन्स ३० एप्रिल २०२३ पर्यंत आयवूमी जीतएक्स आणि आयवूमी एस१ च्या खरेदीमध्ये एन्कॅश करता येतील.