वस्ती,पाडे,गावात देवदत्त पाठक यांच्या २१ मोफत अभिनय कार्यशाळा

पुणे:उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायची असते खरं तर घाई ,पण मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी नाटक करण्यासाठी,मुलं स्वतःच थांबून राहतात घरीच, देवदत्त पाठक यांच्या नाट्यकार्यशाळेसाठी …२१गाव २१ संस्था आणि २१कार्यशाळा यांच्यासाठी खास उन्हाळ्याच्या सुट्टीत मोफत राबवलेला हा अभिनय कार्यशाळा म्हणजेच रंगभूमी प्रबोधन कार्यशाळेचा प्रकल्प आहे. रंगमंचीय खेळ आणि रंगभूमी पाठ ही अभिनव संकल्पना यासाठी वापरली जात आहे. शिस्त, वेळेचे भान ,कल्पना आणि विचारशक्ती वापर होतोय.

मुंबईमधली उपनगरे, पनवेल, ठाणे, परभणी, आंबेजोगाई, अमरावतीपासून पुण्यातल्या आजूबाजूच्या वस्त्या पाड्यामध्ये या रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर गुफांनच्या संयोजनातून घेत आहेत. कडक उन्हाळा असला तरी सुद्धा मुलांना रंगभूमी कलेचा गारवा मिळतोय. व्यक्त होण्यासाठी मिळणाऱ्या संधीतून मुले आनंदाने खेळत बागडत आपल्यातील क्षमता आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी उषा देशपांडे ,सीमा जोगदंनकर आणि त्यांची विद्यार्थी टीम कार्यरत आहे. ९जूनपर्यंत हा मोफत उपक्रम चालणार आहे.