मुंबई: स्टडी ग्रुप या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाताने भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील सर्वोच्च युनिव्हर्सिटीमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि कम्प्युटर सायन्सेस यांसह प्रगत तंत्रज्ञान विषयांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत करण्याच्या उद्देशाने इव्हेण्ट्सची सिरीज राबवण्यासाठी त्यांच्या दोन सहयोगी युनिव्हर्सिटी फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी आणि डीपॉल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत सहयोग केला आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांची उच्च मागणी लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञान पदवींप्रती लोकप्रियता दाखवत मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि आनंद येथे झालेल्या शिक्षण सत्रांमध्ये जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्टडी ग्रुपचे भारतातील प्रादेशिक संचालक करण ललित म्हणाले, ‘आमच्या पाठिंब्याने आंतरराष्ट्रीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०२० पासून दुप्पट झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगार क्षमतेसाठी त्यांच्या जगप्रसिद्ध प्रतिष्ठेमुळे यूके आणि यूएसएमधील युनिव्हर्सिटीजची लोकप्रियता येत्या काही वर्षांत वाढत राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासांमध्ये विशेष स्वारस्य दिसून येत आहे आणि भारतीय संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी उत्कृष्टतेची तीन केंद्रे स्थापन केली जातील या बातमीनंतर यामध्ये निश्चितच वाढ होईल. ज्यामुळे आम्हाला भारतीय विद्यार्थी सतत विकसित होत असलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या लँडस्केपनुसार शिक्षण घेण्याचा आणि गतीशी जुळून घेण्याचा विश्वास आहे.’