सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये ८ टक्के परतावा दिला: एंजल वन

मुंबई : सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, यूएस व युरोपियन बाजारपेठेतील मंदीचे वातावरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत्या व्याजदरातील अस्थिरता, यूएस आर्थिक स्थितीत घट असे घटक सोन्याची किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

‘डॉलरची वाटचाल वस्तूंची दिशा ठरवण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावते. २८ मार्च २०२३ पर्यंत डॉलर निर्देशांक १.१३ टक्क्यांनी घसरला आहे, तर सोन्याच्या किंमती ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तुलनेत २०२२ मध्ये डॉलर निर्देशांक ८ टक्क्यांनी वाढला आणि सोन्यामधून स्थिर परतावा मिळाला नाही. २०२३ मध्ये डॉलरचा निर्देशांक कसा पुढे जाईल यात महत्त्वाची भूमिका बजावणारी पुढील व्याजदर वाढ आणि इतर आर्थिक डेटा सेटमध्ये यूएस फेडच्या भूमिकेद्वारे डॉलरची दिशा निर्धारित केली जाईल.

गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन १८०० डॉलर्स आहे, जिथे सर्वाधिक रेलचेल आहे आणि २०२३ मध्ये लक्ष्य मूल्य प्रति औंस २२०० डॉलर्स असेल. दुसरीकडे भारतातील गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन जवळपास प्रति १० ग्रॅम ५५,००० रूपये असेल आणि २०२३ च्या अखेरपर्यंत लक्ष्य प्रति ग्रॅम ६२,००० रूपये असेल,’ असे प्रथमेश माल्या यांनी नमूद केले.

२०२३ मध्ये सोन्यासाठी स्थिती अनुकूल आहे का?

महागाईचा भार कमी करण्यासाठी यूएस फेडने संपूर्ण २०२२ मध्ये अग्रेसर पाऊल उचलले आहे आणि २०२३ मध्ये व्याजदरांमध्ये वाढ सुरू ठेवली आहे. फेड दरांमध्ये वाढ कितपत चालू ठेवेल याबाबत माहिती नसले तरी सुरक्षित मालमत्तेमध्ये, विशेषत: सोन्यामध्ये जागतिक गुंतवणूकदारांची रूची लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच यूएसमधील बँकिंग संकटामुळे (सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि क्रेडिट सईसमध्ये घट) अलिकडील आठवड्यांमध्ये गुंतवणूकदारांची सुरक्षित आश्रयस्थानाप्रती रूची वाढली आहे. सोने हा मालमत्ता वर्ग आहे, ज्याकडे सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून पाहिले जाते, जिथे आर्थिक यंत्रणेमध्ये स्थिती काहीशी अवघड झाली की पैसा येऊ लागतो.

तसेच २०२२ मध्ये विक्रमी प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी सेंट्रल बँकांनी घाई केल्याने जागतिक गुंतवणूकदारांचा या मालमत्ता वर्गावर विश्वास वाढला. २०२२ हे ११३६ टनांच्या एकूण सोने खरेदीसह सेंट्रल बँकेसाठी विक्रमी वर्ष ठरले.

२०२३ मध्ये सोने कुठे जाईल?
अनपेक्षित आर्थिक मंदीचा यूएसमधील प्रबळ अर्थव्यवस्थेला फटका बसला नाही आणि मागणीची पूर्तता करण्यासाठी, तसेच महागाईच्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रबळ योजनांची गरज आहे. यूएस डॉलरची क्षमता आणि कमकुवतपणा पुढे वाटचाल करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामधून २०२३च्या उर्वरित महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये होणारे बदल निर्धारित होईल. व्यापक भौगोलिक-राजकीय जोखीम, विकसित बाजारपेठेतील आर्थिक मंदी, व्याजदरातील सर्वोच्च वाढ व अमेरिकन डॉलरमधील संभाव्य कमकुवतपणा, बँक संकटामुळे इक्विटी मूल्यांकनास जोखीम आणि शेवटचे, पण महत्त्वाचे म्हणजे सोने खरेदी करणारी सेंट्रल बँक या सर्वांमधून सोने २०२३ मध्ये बजावणाऱ्या कामगिरीची खात्री मिळेल.

भारतातील गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन जवळपास प्रति १० ग्रॅम ५५,००० रूपये असेल आणि २०२३ च्या अखेरपर्यंत लक्ष्य प्रति ग्रॅम ६२००० रूपये असेल.