मुंबई : द इंडस आंत्रेप्रीन्युअर्स (टीआयई) मुंबईने जाहीर केले की, ‘डॉ. अपूर्व शर्मा मार्च २०२३ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी टीआयई मुंबईचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तसेच रानू वोहरा याच कालावधीसाठी टीआयई मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.’
‘आम्हाला भारतातील स्टार्टअप क्षेत्रात प्रचंड वाढ होताना दिसण्यात येत आहे. मी टीआयई मुंबई येथील माझ्या नवीन पदभाराबाबत अत्यंत उत्सुक आहे, ज्यामुळे मला या गतीला पुढे नेण्याप्रती योगदान देण्यास मदत होईल. मी अमित मुकिम यांचे टीआयई मुंबई येथीत अत्यंत यशस्वी कार्यकाळासाठी अभिनंदन करतो. मी संरचित मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करण्यासह ही गती कायम ठेवण्याकरिता रानू वोहरा आणि बोर्डसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ज्यामुळे उद्योजकतेला व नवोन्मेष्काराला चालना देत, ज्ञानाची देवाण-घेवाण करत आणि निधीसाह्य करत विविध भागधारकांच्या मूल्यामध्ये वाढ करता येईल. टीआयई मुंबई सध्या इकोसिस्टमच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रगती करण्यास आणि अधिक उपक्रम राबवण्यास सज्ज आहे,’ असे टीआयई मुंबईचे नियुक्त अध्यक्ष डॉ. अपूर्व शर्मा यांनी सांगितले.
टीआयई मुंबईने गेल्या २४ महिन्यांत आपल्या कामकाजाच्या आणि उद्योजकांपर्यंत पोहोचण्याच्या सर्व बाबींमध्ये लक्षणीय सकारात्मक प्रगती केली आहे. महामारीनंतर टीआयई मुंबई डिजिटल स्पेसमधून यशस्वीरित्या बाहेर पडत प्रत्यक्ष भेटी, इव्हेण्ट्स आणि कॅच अप्सच्या जगात परतण्यासह यशस्वी झाली.
रानू वोहरा आणि डॉ.अपूर्व शर्मा यांचे स्वागत करत टीआयई मुंबईचे माजी अध्यक्ष अमित मुकीम म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत टीआयई मुंबईने ७० चार्टर सदस्यांवरून आज १४० हून अधिक चार्टर सदस्यांपर्यंत वाढ केली आहे. टीआयईकॉन, ओपन इनोव्हेशन प्रोग्राम्स, मेम्बरशीपच्या संयोजनाच्या माध्यमातून टीआयई मुंबईचा महसूल दुपटीने वाढला आहे आणि या वर्षांखरेपर्यंत महसूल तिपटीने वढण्याची अपेक्षा आहे. आज आम्ही आमचे गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स दृढ करत आहोत, ३ ते ५ वर्षांचे व्हिजन व लीडरशीप लक्षात घेत प्रबळ टीम, बोर्ड आणि चार्टर सदस्य निर्माण करत आहोत. रानू आणि अपूर्व दीर्घकाळपासून टीआयई मुंबई लीडरशीप आणि टीआयई नेटवर्कचे भाग राहिले आहेत. ते दोघेही टीआयई मुंबईमध्ये अधिक वाढ करण्यास आणि ही विकास गती कायम ठेवण्यास उत्तमरित्या स्थित आहेत.’