मुंबई : शून्य या अग्रगण्य झीरो-ब्रोकरेज ट्रेडिंग व्यासपीठाने त्यांचे स्वतंत्र बाह्य ऑडिटर म्हणून प्रतिष्ठित बिग ४ फर्म्सच्या नियुक्तीची घोषणा केली. १३ एप्रिल २०२३ ला टेक्निकल समस्येमुळे ट्रेडिंग व्यासपीठावर झालेल्या परिणामाचे पुनरावलोकन करण्यासाठी हे ऑडिट करण्यात येणार आहे. शून्यने आगामी ट्रेडिंग सत्रामधून सामान्य स्थिती असण्याच्या खात्रीसाठी अंतर्गत ऑडिट आणि मॉक ट्रेडिंग सत्रे देखील आयोजित केली.
या ऑडिट कंपनीची नियुक्ती करण्यामागे कंपनीचा शून्यच्या ट्रेडिंग व्यासपीठामध्ये पारदर्शकता, जबाबदारपणा आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्याचा मनसुबा आहे. ऑडिट कंपनी शून्यच्या ट्रेडिंग व्यासपीठाचे सर्वसमावेशक मूल्यांकन करेल, तसेच त्यांच्या पायाभूत सुविधा, सुरक्षा उपाय, कार्यरत प्रक्रिया आणि जोखीम व्यवस्थापन पद्धतींचे विश्लेषण करेल. ऑडिट प्रक्रिया स्वतंत्र मूल्यांकन प्रदान करेल, ज्या्मुळे उद्योग मानक व नियामक आवश्यकतांचे पालन करण्याप्रती शून्यची समर्पितता अधिक दृढ होईल.
फिनवासियाचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सर्वजीत विर्क म्हणाले, ‘स्वतंत्र ऑडिटर म्हणून बिग ४ फर्म्सपैकी एका कंपनीची नियुक्ती करण्यामधून पारदर्शकता आणि ग्राहक विश्वासाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमच्या सिस्टम्स, प्रक्रिया आणि नियंत्रणांचे निःपक्षपाती आणि कठोर मूल्यांकन खात्री घेईल की आम्ही तंत्रज्ञान, नैतिकता आणि ग्राहक-केंद्रित विचारसरणीसाठी उच्च उद्योग मानकांची पूर्तता करत आहोत. फर्मच्या कौशल्याचा फायदा घेऊन आम्हाला आमच्या व्यासपीठाची कार्यक्षमता वाढवण्याचा आणि आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी अपवादात्मक व्यापार अनुभव सुनिश्चित करण्याचा आत्मविश्वास आहे.’
उद्योग अग्रणी म्हणून शून्यला ग्राहकांसाठी प्रामाणिकपणा आणि सुरक्षिततेचे उच्च मानक राखण्याचे महत्त्व माहित आहे. स्वतंत्र बाह्य ऑडिटरच्या नियुक्तीमधून विशेषत: नियामकांकडून अनिवार्य नसताना ग्राहकांना विश्वसनीय आणि विश्वासार्ह ट्रेडिंग अनुभव देण्याप्रती शून्यची कटिबद्धता दिसून येते.