आयसीएसईच्या दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल १४ मेला दुपारी ३:०० वाजता होणार जाहीर

मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससीच्या (बारावी) परीक्षेचा निकाल रविवारी १४ मेला दुपारी ३:०० वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे, त्यासाठीची घोषणा मंडळाकडून करण्यात आली.

आयसीएसई मार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची( आयसीएसई) परीक्षा २७ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. तर बारावीची (आयएससी) परीक्षा २९ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ती ३१ मार्चपर्यंत चालली होती. यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी बारावीची या परीक्षेला देश विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे २.५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.