मुंबई : झूमकार या उदयोन्मुख बाजारपेठांमधील अग्रगण्य बाजारस्थळाने जाहीर केले की, त्यांचे आता ५ दशलक्षहून अधिक अतिथी आणि त्यांच्या समुदायामध्ये २०,००० हून अधिक होस्ट्स आहेत. प्लॅटफॉर्मवर २०,००० हून अधिक कार्स असलेल्या झूमकारने २ बिलियनहून अधिक किलोमीटर अंतर पार केले आहे आणि त्यांच्या प्रेमळ होस्ट्सकडून भरपूर कौतुक करण्यात आले आहे.
झूमकार इंडियाचे कंट्री हेड नवीन गुप्ता म्हणाले, ‘आम्हाला आमच्या होस्ट्सकरिता अधिक आर्थिक सक्षमीकरण निर्माण करण्याच्या आमच्या प्रवासामधील हा उत्साहवर्धक टप्पा पार करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. झूमकार ४५ हून अधिक शहरांमध्ये १,००० हून अधिक एसकेयूंसह एअरपोर्ट्स आणि रेल्वे स्टेशन्स यांसारख्या परिवहन सुविधा देते. झूमकारचा हॅचबॅक्स, सेदान्स, एमयूव्ही, एसयूव्ही, ईव्ही आणि लक्झरी कार्स या श्रेणींमधील कार्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ आहे. व्यासपीठ म्हणून आम्ही आमच्या व्यासपीठाचा उपयोग करणाऱ्या होस्ट्सच्या आकडेवारीमध्ये अपवादात्मक वाढ पाहिली आहे आणि अधिकाधिक कारमालकांना झूमकारवर होस्टिंगचे आर्थिक फायदे समजत असल्यामुळे आम्हाला व्यासपीठावर या आकडेवारी अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. आमची टीम झूमकार व्यासपीठावरील आमचे होस्ट्स आणि अतिथींना उत्साहवर्धक ग्राहक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.’
फेसबुकवर जाहिरात पाहिल्यानंतर बेंगळुरूमधील शशी शेखर झूमकारचे होस्ट बनले. ही जाहिरात यासाठी अगदी योग्य वेळी आली होती, जिथे ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करणाऱ्या शशी यांना महामारीमुळे आपली नोकरी गमावावी लागली होती. त्यांनी अतिरिक्त कमाई करण्याचे ठरवले आणि आता दोन वर्षांमध्ये ४ कार्ससह झूमकारमध्ये पूर्ण-वेळ होस्ट बनले आहेत. ‘माझी नवीन मॉडेल कार किया सेल्टोस होती आणि त्यावेळी कारने फक्त दोन हजार किलोमीटर प्रवास केला होता. म्हणून मी झूमकारसोबत हा प्रयत्न करण्याचे ठरवले. आता फक्त दोन वर्षांमध्ये माझ्याकडे चार कार्स आहेत आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी सहा कार्सची भर करणार आहे. झूमकार प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे मला दररोज कमाई मिळत आहे, ज्यामधून घरगुती आणि कौटुंबिक खर्चांसह माझे सर्व खर्च भागवले जातात. माझी आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ देखील व्यतित करत आहे. झूमकारने निश्चितच माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. व्यासपीठावरील माझे आवडते वैशिष्ट्य म्हणजे नुकतेच सादर करण्यात आलेले परफॉर्मन्स डॅशबोर्ड, जिथे मी माझ्या कार्सची कामगिरी आणि परताव्यांवर देखरेख ठेवू शकतो.’
झूमकारवरील आणखी एक होस्ट आयुर्वेदिक फॅक्टरीचे मालक जगदीश जवार यांना स्वत:चे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधत असताना झूमकारबाबत समजले. ‘एका मित्राकडून आम्हाला झूमकारने ऑफर केलेल्या उत्तम व्यवसाय संधीबाबत समजले. आम्ही झूमकारमधील काही लोकांना भेटलो आणि एका कारमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले. सध्या आमच्याकडे तीन एर्टिगा आणि एक सियाज अशा चार कार्स आहेत आणि आम्हाला लक्षणीय वाढ दिसून येऊ शकते. प्रत्येक कार प्रतिमहिना जवळपास ४०,००० रूपयांची कमाई करून देते, म्हणजेच चार कार्ससह आम्ही जवळपास १.५ लाख रूपयांची कमाई करतो. परफॉर्मन्स आणि झूमकारच्या साहाय्याने मिळालेल्या डेटाच्या आधारावर आमचा अधिक सात-आसनी व ऑटोमॅटिक कार्सची भर करण्याचा विचार आहे, जेथे एर्टिगा आम्हाला उच्च परतावा देत आहे. सामान्यत: प्रत्येकाकडे पाच-आसनी कार असते, पण मित्र किंवा कुटुंबियांसोबत प्रवास करायचा असेल तर सात-आसनी कारची गरज भासते. म्हणून, झूमकार ताफ्यामध्ये सात-आसनी कार्सची भर करणे उत्तम बाब आहे.’