मुंबई : मे २०२३ मध्ये तेल आणि गॅस, रिअल इस्टेट, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रे बनली नोकरभरतीचे हॉटस्पॉट ठरले असल्याचे नोकरीजॉबस्पीक सूचकांकामधून निदर्शनास आले आहे. नोकरभरतीविषयी अचूक चित्र मांडणारा नौकरीजॉबस्पीक सूचकांक मे २०२३ मध्ये २,८४९ वर म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत ५% तर मे २०२२ मधील आपल्या २,८६३ या मूल्याच्या जवळपास समसमान पातळीवर राहिला. “रिअल इस्टेट, बँकिंग, तेल आणि वायु, फार्मा यांसारख्या क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये झालेल्या बहु-क्षेत्रीय वाढीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या आणि विविधतापूर्ण स्वभाव प्रतिबिंबित झाला असल्याचे नोकरीडॉटकॉमचे चीफ बिझनेस ऑफिसर पवन गोयल म्हणाले.
नोकरभरतीची हॉटस्पॉट क्षेत्रे:
नवीन नोकऱ्यांच्या संख्येमध्ये आधीच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या १०-२०% वाढीच्या तुलनेत नवीन मे महिन्यात तब्बल ३१% इअर-ऑन-इअर वाढ साधत तेल आणि गॅस सेक्टर क्षेत्राने आपली घोडदौड सुरू ठेवली. ऊर्जा सुरक्षा आणि रिफायनरीच्या विस्तारावर नव्याने लक्ष केंद्रित केल्यामुळे या क्षेत्रामध्ये ही वाढ नोंदवली गेली असे म्हणता येईल. प्रोडक्शन इंजिनीअर्स, प्रोसेस इंजिनीअर्स आणि क्वालिटी ऑडिटर्स या पदांसाठीची मागणी लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले. हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मध्यम आणि उच्च पदांवरील नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रांमध्येही नोकरभरतीच्या आघाडीवर सकारात्मक वातावरण दिसून आले. या क्षेत्रांतील नोकरभरतीमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे २२% आणि १४% वाढ झाली. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, सिव्हिल इंजीनिअर आणि साइट सुपरवाइझर यांसारख्या बांधकामांशी संबंधित कामांसाठी नोकरभरतीमध्ये वाढ झाली. बँकिंग क्षेत्रामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आणि क्रेडिट अॅनालिस्ट या पदांना असलेल्या मागणीने उसळी घेतली. भौगोलिक प्रदेशांच्या संदर्भात बोलायचे झाले तर रिअल इस्टेट आणि बँकिंक नोकऱ्यांमध्ये कोलकाता, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांनी सर्वाधिक वाढ अनुभवली. इथे १२ वर्ष त्याहून अधिक अनुभव असलेले वरीष्ठ व्यावसायिक हे कंपन्यांकडून सर्वाधिक मागणी असलेले कर्मचारी ठरले.
फार्मा क्षेत्रसुद्धा चमकदार कामगिरी करून दाखविणारे आणखी एक क्षेत्र ठरले, जिथे नोकरभरतीच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ११ टक्क्यांची चांगली वाढ नोंदवली गेली. फार्मा प्रोडक्ट मॅनेजर्स आणि क्लिनिकल असिस्टंट्स यांसारख्या विशेष कौशल्यांची आवश्यकता असलेल्या पदांसाठीच्या नोकरभरतीमध्ये वाढ झाली. मुंबई आणि चेन्नई येथे मागणी विशेषत्वाने अधिक होती आणि या ठिकाणी मध्यम स्तरांवरील व्यावसायिक हे सर्वाधिक मागणी असलेले उमेदवार ठरले.
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत १०% ते ८% वाढ साधणारी ऑटोमोबाइल आणि हॉस्पिटॅलिटी ही क्षेत्रेही नोकरभरतीच्या सकारात्मक प्रवाहाची साक्षीदार ठरलेल्या आणखी काही क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट झाली.
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या भरभराटीच्या काळाच्या तुलनेत नवीन नोकऱ्यांच्या संख्येत २३% घट नोंदविणारे आयटी उद्योगक्षेत्र हा एक चिंतेचे क्षेत्र राहिले. नोकरभरतीमधील ही घट जागतिक स्तरावरील महाकाय टेक कंपन्या, आयटी सेवा पुरविणाऱ्या मोठ्या कंपन्या, तंत्रज्ञानावर भर असणारे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्न्स अशा सर्व प्रकारच्या आयटी कंपन्यांमध्ये अनुभवास आली. बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यांसारख्या आयटीकेंद्री कंपन्यांची प्रचंड संख्या असलेल्या शहरांना याचा सर्वात मोठा फटका बसला. पण अशी आव्हानात्मक स्थिती असूनही मशीन लर्निंग इंजिनीअर्स आणि बिग डेटा इंजिनीअर्स यांसारख्या विशेष कौशल्याची गरज असलेल्या पदांसाठीच्या भरतीचा कल सकारात्मक राहिला. तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर बहुतांश नोकऱ्यांच्या बाबतीत दिसून आलेल्या नकारात्मक प्रवाहाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. याखेरीज रिटेल, शिक्षण, विमा आणि बीपीओ या क्षेत्रांमध्ये मे २०२२ मधील नोकरभरतीच्या स्थितीच्या तुलनेत अनुक्रमे २१%, १६%, १५% आणि १४% घट झाल्याने नकारात्मक कल दिसून आला.
नोकरभरतीचे उदयोन्मुख केंद्रबिंदू : बिगर-मेट्रो शहरे नोकर भरतीच्या लाटेमध्ये आघाडीवर
बिगर-मेट्रो अर्थात महानगरांव्यतिरिक्तची शहरे ही नोकरभरतीच्या बाबतीत नवा कल प्रस्थापित करणारी ठिकाणे ठरली आणि यात अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूर या शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत नोकरभरतीच्या घडामोडींमध्ये अनुक्रमे २६%, २२%, आणि १७% इतकी वाढ झाली, ज्याला प्रामुख्याने बँकिंग आणि ऑटो क्षेत्रांनी चालना दिली.
दुसऱ्या बाजूला मे २०२३ मध्ये नोकरभरतीच्या उलाढालींत ५% वाढ नोंदविणाऱ्या मुंबई आणि दिल्लीचा अपवाद वगळता इतर मोठ्या महानगरामध्ये नोकरभरतीमधील वाढीचा आलेख सपाट किंवा किंचित उतरताच राहिला. या वाढीमध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये रिअल इस्टेट आणि टेलिकॉम यांसारख्या तर दिल्लीतील ऑटो क्षेत्रासारख्या विशिष्ट क्षेत्रातील नोकरभरतीने घेतलेल्या उसळीचा पुढाकार होता.
वरीष्ठ व्यवसायिकांना मोठी मागणी:
नोकऱ्यांची बाजारपेठ ही नोकरीच्या शोधात असलेल्या वरीष्ठ व्यावसायिकांसाठी तेजीमध्ये राहिली. विशेषत: १३-१६ किंवा १६ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांना खुल्या होणाऱ्या नव्या नोकऱ्यांच्या संख्येत गेल्या मे महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे २६% आणि ३९% वाढ झाली. शिक्षण, ऑटो आणि ऑइल या क्षेत्रांमध्ये वरीष्ठ व्यावसायिकांच्या भरतीमध्ये ही तेजी दिसून आली. नवीन उमेदवारांच्या आणि मध्यम पदांवरील व्यावसायिकांच्या पदांसाठीच्या भरतीमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही आणि गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत त्यात ७% घट झाली. ही घट होऊनही विमा आणि हेल्थकेअर क्षेत्रामध्ये नव्या उमेदवारांच्या भरतीसाठीचे वातावरण सकारात्मक राहिले.