मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने प्रबळ मागणी, लक्झरी कार विभागात विकास, विकसित होते असलेले डेमोग्राफिक्स आणि अनुकूल आर्थिक स्थितींच्या आधारावर प्रबळ विक्री कामगिरी कायम ठेवली. ब्रॅण्डने जानेवारी ते जून २०२३ या कालावधीमध्ये ३,४७४ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘पुरवठ्यासंदर्भात आव्हाने आणि वाढता इनपुट खर्च असताना देखील वर्षाच्या पहिल्या सहामाहीमधील आमच्या कामगिरीने वर्षातील यशस्वी दुसऱ्या सहामाहीसाठी पाया रचला आहे. आमचे व्हॉल्यूम मॉडेल्स ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी ए४ आणि ऑडी ए६ यांना प्रबळ मागणी मिळत आहे. आमच्या टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी क्यू८ एल, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८ आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी हे देखील उत्तम आकडेवारींसह विकसित होत आहेत. आमच्या इलेक्ट्रिक श्रेणीमधील नवीन मॉडेल ऑडी क्यू८ ई-ट्रॉन लवकरच लाँच करण्यात येईल आणि आम्हाला या विभागामध्ये देखील यश मिळण्याचा आत्मेविश्वास आहे.’
२०२३ च्या पहिल्या सहामाहीत ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस (पूर्व-मालकीचा कार व्यमवसाय) ५३ टक्क्यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्यवसाय ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसचे विस्तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी पंचवीस ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्ड विस्तार करत आहे आणि २०२३ च्या अखेरपर्यंत सत्तावीस पूर्व-मालकीच्या कार सुविधा असतील.
इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम – ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी ७५० हून अधिक चार्ज पॉइण्ट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पुढील काही महिन्यांत अधिक भर होईल.
ऑडी इंडिया उत्पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८, ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.