मुंबईच्या के ई एम रुग्णालयात सुमारे १० वर्षांपूर्वीपासून टेली मेडीसिनचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित आहे. अशा विविध बाबतीत पुढाकार घेणारे के ई एम रुग्णालय गेल्या अनेक दशकांपासून लाखो रुग्णांची सेवा करत आहे.
मुंबई : लोकसभेत के ई एम रुग्णालयाला एम्सचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. देशभरात टेली मेंटल हेल्थ सेंटर्स सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचं स्वागत करत असतानाच खासदार राहुल शेवाळे यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या के ई एम रुग्णालयात सुमारे १० वर्षांपूर्वीपासून टेली मेडीसिनचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित आहे. अशा विविध बाबतीत पुढाकार घेणारे के ई एम रुग्णालय गेल्या अनेक दशकांपासून लाखो रुग्णांची सेवा करत आहे. त्यामुळे मुंबईच्या के ई एम रुग्णालयाला एम्सचा दर्जा द्यावा.’ असे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेतील भाषणात म्हटलं आहे