मुंबई : अवनी या स्त्रीच्या काळजीच्या आणि स्वच्छतेच्या स्टार्टअपला, आपल्या सुरक्षित आणि टिकाऊ मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या उपायांसह महाराष्ट्रातील मासिक पाळीवरील त्यांच्या लक्षणीय प्रभावाची घोषणा करताना अभिमान वाटतो. मासिक पाळीच्या काळजीच्या पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी ‘अवनी’च्या (Avni) समर्पणाने प्रशंसा आणि मान्यता मिळविली आहे, कारण महाराष्ट्रातील हजारो महिला त्यांच्या मासिक पाळीसाठी पर्यावरणासाठी आणि त्वचेसाठी अनुकूल पर्याय स्विकारत आहेत.
या क्षेत्रातील २७,५०० महिलांना सेवा पुरवल्यानंतर अवनीने आर्थिक वर्ष २०२३च्या अखेरीस १,००,००० महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून, राज्यभरातील मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या पद्धतींमध्ये बदल करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. महाराष्ट्रातील अवनीची सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने म्हणजे, अवनी लश अँटीमाइक्रोबियल क्लॉथ सॅनिटरी नॅपकिन्स आणि क्लॉथ पँटी लाइनर्स आहेत. हे पारंपारिक डिस्पोजेबल पर्यायांसाठी आरामदायक आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करतात.
अवनीच्या सह-संस्थापक सुजाता पवार म्हणाल्या, ‘महाराष्ट्रावर अवनीचा प्रभाव खरोखरच उत्साहवर्धक आणि समाधानकारक आहे. राज्यातील मासिक पाळी अनुभवणाऱ्या महिलांच्या जीवनात आम्ही जे सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे, ते पाहून मला खूप अभिमान वाटतो. आम्ही मासिक पाळीच्या सक्षमीकरणाचा आमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी दृढनिश्चयी आहोत आणि आमच्या समर्पित टीमच्या पाठिंब्याने, आम्हाला आणखी मोठे यश गाठण्याचा विश्वास आहे. महाराष्ट्र ही केवळ सुरुवात आहे आणि आम्ही संपूर्ण भारतभरातील अनेक महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत. शिवाय, मी, अवनीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मासिक पाळी अनुभवणाऱ्या अशा महिलांचे आणि आमच्या टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी उत्कटतेने आणि मेहनतीने आम्हाला या टप्प्यावर आणले आहे.’
अवनीचा मासिक पाळीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने केलेला प्रवास काही कमी नाही आणि त्याने भारतभरातील ६५,००० महिलांना प्रभावित केले आहे. आर्थिक वर्ष २०२३च्या अखेरीस देशभरात ५,००,००० महिलांवर सकारात्मक परिणाम करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवून, अवनीने मासिक पाळीच्या आरोग्य परिस्थितीमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. आजीच्या आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाने प्रेरित होऊन, अवनीला एक अशा जागरूक मासिक पाळी स्वच्छता ब्रँड असल्याचा अभिमान आहे, जो कल्पित आणि निषिद्ध गोष्टींच्याविषयी खुल्या आणि प्रामाणिक चर्चांना प्रोत्साहन देतो. विविध पुढाकारांच्या आणि संपर्क कार्यक्रमांच्या माध्यमातून, अवनीने मासिक पाळीला कलंकापासून मुक्त करण्यासाठी अचूक माहितीसह अनेक क्षेत्रांमध्ये मासिक पाळी अनुभवणाऱ्या महिलांचे सशक्तीकरण केले आहे.