एंजल वनची व्यावसायिक वाढ कायम

मुंबई: एंजल वन लिमिटेडने ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेली तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. एंजल वनची सरासरी दैनिक उलाढाल २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २२.७ ट्रिलियन रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १८.५ ट्रिलियन रूपये होती ज्या‍मध्ये तिमाही-ते-तिमाही २३ टक्क्यांची वाढ झाली. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २२.७ ट्रिलियन रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ९.४ ट्रिलियन रूपये होती ज्या‍मध्ये वार्षिक १४२ टक्यांची वाढ झाली.

कंपनीचा एकत्रित एकूण महसूल २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ८,१११ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ८,३११ दशलक्ष रूपये होता ज्यामध्ये तिमाही-ते-तिमाही २ टक्क्यांची घट झाली. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ८,१११ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ६,८४५ दशलक्ष रूपये होता ज्यामध्ये वार्षिक १८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

कंपनीचा एकत्रित ईबीडीएटी २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ३,०५६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ३,७०५ दशलक्ष रूपये होता. ज्यामध्ये तिमाही-ते-तिमाही १८ टक्क्यांची घट दिसून आली. ईबीडीएटी मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या टक्के) २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ४८.६ टक्के राहिले. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ३,०५६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत २,४९१ दशलक्ष रूपये होते ज्यामध्ये वार्षिक २३ टक्क्यांची वाढ झाली.

एंजल वनचा कार्यसंचालनांमधून एकूण करोत्तर नफा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २,२०८ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या चौथ्या तिमाहीत २,६७० दशलक्ष रूपये होता ज्यामध्ये तिमाही-ते-तिमाही १७ टक्क्यांची घट झाली. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २,२०८ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १,८१६ दशलक्ष रूपये होता ज्यामध्ये वार्षिक २२ टक्क्यांची वाढ झाली.

अंतरिम म्हणून संचालक मंडळाने १० रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी ९.२५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे, हा लाभांश तिमाहीतील एकत्रित करोत्तर नफ्याच्या ३५ टक्क्यांशी समतुल्य आहे.

एंजल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर म्हणाले, ‘एंजल वनने प्रबळ कामगिरी कायम राखली आहे, जिथे आम्ही १५ दशलक्ष क्लायण्ट्सचा टप्पा पार केला, रिटेल ओव्हरऑल इक्विटी टर्नओव्हर आणि एनएसई अ‍ॅक्टिव्ह क्लायण्ट्समध्ये आमचा आतापर्यंतचा सर्वोच्च मार्केट शेअर संपादित केला. आम्ही तंत्रज्ञान आणि उत्पादनामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले, आमच्या सर्व डिजिटल व्यासपीठांवरील क्लायण्ट अनुभवामध्ये सुधारणा केली, नियमितपणे प्रमुख कार्यक्षमता आणि सुधारणा सादर केल्या. यामुळे एकूण एनपीएसमध्ये ऐतिहासिक उच्च वाढ झाली आहे. मला सांगताना आनंद होत आहे की, एंजल वन प्लेस्टोअर व अ‍ॅपस्टोअरमधील मोफत फायनान्स अ‍ॅप्सच्या टॉप-१५ क्लबमध्ये समाविष्ट झाली आहे, तसेच आम्ही बँकिंग, पेमेंट, लेण्डिंग आणि वेल्थ अ‍ॅप्ससोबत स्पर्धा करतो.’