मुंबई : जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण असताना देखील प्रॉपटेक कंपन्यांमधील निधी २०२२ मध्ये काहीसा घसरत ७१९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला. पण प्रॉपटेक क्षेत्राने २००९ ते २०२२ दरम्यान जवळपास ४ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या एकत्रित गुंतवणूकीसह स्थिरता दाखवली आहे, ज्यामधून ४९ टक्यांच्या उल्लेखनीय कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेटची (सीएजीआर) नोंद झाली असल्याचे हाऊसिंगडॉटकॉमच्या सर्वसमावेशक अहवालातून निदर्शनास आले आहे.
हाऊसिंगडॉटकॉम, प्रॉपटायगरडॉटकॉम आणि मकानडॉटकॉम समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाला म्हणाले, ‘जागतिक मंदी असताना देखील २०२२ मध्ये प्रॉपटेक क्षेत्रातील गुंतवणूका स्थिर राहिल्या. गेल्या दशकभरात, विशेषत: गेल्या तीन वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन्स उत्प्रेरक ठरले, ज्यामधून उद्योगामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला चालना मिळाली.’
प्रॉपटेक कंपन्यांमधील निधी गेल्या वर्षातील ७४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून काहीसा घसरला असला तरी उद्योगातील विशिष्ट विभागांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची पसंती मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे को-लिव्हिंग आणि को-वर्किंग यांसारख्या शेअर्ड इकॉनॉमी प्लॅटफॉर्म्सनी बहुतांश शेअर संपादित केला, जिथे एकूण निधी आवकमध्ये त्यांचे ६४ टक्यांचे योगदान होते. गुंतवणूकदारांच्या विश्वामध्ये या वाढीचे श्रेय या विभागांमधील वाढीच्या क्षमतेला जाऊ शकते.
तसेच बांधकाम तंत्रज्ञान सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या प्रॉपटेक कंपन्यांशना २०२२ मध्ये एकूण निधींपैकी १५ टक्केे निधी मिळाला. या ट्रेण्डममधून रिअल इस्टेट डेव्हलपर्स बांधकामासाठी लागणारा कालावधी कमी करण्या सोबत उच्च दर्जाचे मानक कायम राखण्यावर देत असलेली अधिक भर दिसून येते. वाढत्या बांधकाम चक्रामुळे प्रकल्प खर्चामध्ये वाढ होणाऱ्या भारतासारख्या देशांमध्ये प्रभावी प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रॉपटेक सोल्यूयशन्सचा अधिकाधिक फायदा घेतला जात आहे.
ध्रुव अगरवाला पुढे म्हणाले, ‘ गेल्याा तीन वर्षांमध्येा कोवर्किंग विभागामध्ये झपाट्याने वाढ दिसण्यात आली आहे, ज्याचे श्रेय कॉर्पोरेट्समधील स्थिर कार्यस्थळ सोल्यूशन्ससाठी वाढत्या मागणीला जाते. कोविड-१९ महामारी दरम्यान शाळा आणि महाविद्यालये बंद असण्याससोबत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असताना देखील को-लिव्हिंग विभागाने शैक्षणिक संस्था आणि कार्यालये पुन्हा सुरू होण्यासह उल्लेखनीय रिकव्हरी केली. महामारीच्या परिणामांचा सामना केलेल्या को-वर्किंग ऑपरेटर्सनी व्ही-आकाराची रिकव्हरी केली, ज्यात उच्च दर्जाच्या भाड्याच्या निवासस्थानांची भरीव मागणी होती.’