नाशिक : नाटक मनोरंजनाबरोबरच वर्तन तंदुरुस्तीचे काम करते, मुलांना वेळ, कष्ट, निष्ठा, धीर असे मुल्य संस्कार करण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती उपयोगी ठरते. ते संस्कार रुजवण्यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा गावं, शहरातून प्रत्येक रंगकर्मींनी घ्यायला हव्यात असे विचार रंगभूमी कला तज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिटको हायस्कूल नाशिकमध्ये कार्यशाळांचा शुभारंभ झाला. दर शनिवार-रविवार या कार्यशाळांचा लाभ अवघ्या महाराष्ट्राला घेता येणार आहे.कार्यशाळेत बाल नाट्य लेखन, दिग्दर्शन,अभिनय आणि तांत्रिक घटकांचा अनुभव देण्यात येणार आहे.
कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कल्लाल, हेमंत देशपांडे, गुफान सचिव आणि प्रशिक्षक मिलिंद केळकर यांचे आयोजन करण्यात मोलाचे सहकार्य लाभत आहे. मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी सजीव नाट्य कला उपयोगी ठरते आहे, असे मत शिक्षक व्यक्त करत आहेत.