सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्याची भारतीयांची इच्छा: कायक

मुंबई: कायक या जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिनने केलेल्या नवीन ग्राहक संशोधनानुसार सणासुदीच्या काळासह दिवाळी सण जवळ आला असताना भारतीयांची पर्यटनाचा आनंद घेण्याप्रती इच्छा वाढत आहे. १,२०० भारतीयांचे सर्वेक्षण केलेल्या कायक ग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतीय यंदा सणासुदीच्या काळात प्रवासाचा आनंद घेण्यास उत्सुक आहेत. सणासुदीचा काळ नवरात्री आणि दसऱ्यासह सुरू होत दिवाळी आणि भाऊबीजेपर्यंत सुरू राहिल. अनेकजण आपल्या मूळगावी परत जाण्याचा काळ आला असताना कायकच्या ग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले की, सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ९८ टक्के भारतीयांची सणासुदीच्या काळादरम्याान भारतात पर्यटनाचा आनंद घेण्याची इच्छा आहे, तर सर्वेक्षण करण्या‍त आलेल्यांमध्ये ५ पैकी ३ भारतीयांची सणासुदीच्या काळात प्रवासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्याची इच्छा आहे.

भारतात प्रवास करण्यारची इच्छा असलेल्यांसाठी, सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी निम्मे भारतीय (५४ टक्के) देशांतर्गत दोन किंवा अधिक वेळा प्रवास करण्याची योजना आखत आहेत. सणासुदीच्या काळादरम्यान कायकवरील टॉप ट्रेण्डिंग देशांतर्गत गंतव्य आहेत मदुराई (वार्षिक शोधांमध्ये १६५ टक्यांची वाढ), भुवनेश्वर (१०५ टक्के) आणि अहमदाबाद (१०३ टक्के). फ्लाइट्ससाठी टॉप ट्रेण्डिंग आंतरराष्ट्रीय गंतव्य आहेत कोलंबो, श्रीलंका (३४० टक्के वाढ), हाँगकाँग (१६२ टक्के वाढ), सेशेल्स (१३९ टक्के वाढ) आणि टोकियो, जपान (१२८ टक्के वाढ).
ही माहिती ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान प्रवासासाठी कायक सर्च डेटाशी (जानेवारी आणि ऑगस्ट २०२३ दरम्यान इंडियन आऊटबाऊंड शोधांवर आधारित) संलग्न आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशांतर्गत विमानसेवा शोधांमध्येय २९ टक्यांची वाढ झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये १४ टक्यांची वाढ झाली आहे.

कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, ‘यंदा सणासुदीचा काळ भारतीय पर्यटकांसाठी उत्साहवर्धक असणार आहे, जिथे सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश भारतीय बहुप्रतिक्षित ट्रिपचा आनंद घेण्यास किंवा डेटानुसार, अनेक ट्रिप्सचा आनंद घेण्यास सज्ज आहेत. सर्वसमावेशक फ्लाइट्स, हॉटेल किंवा कार हायर पर्याय प्रदान करत कायकमध्ये आम्हीस भारतीय पर्यटकांना आकर्षक दरांमध्ये परिपूर्ण हॉलिडेचा शोध घेण्यास मदत करण्याच्या मिशनवर आहोत.’

७२ टक्के् भारतीय प्रवास करताना सर्वात आनंददायी बाब म्हणजे फूडचा आस्वाद घेण्यास उत्सुक आहेत, तसेच शॉपिंग आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये फेरफटका मारण्यास उत्सुक आहेत. ४५ टक्के भारतीय हॉटेलची निवड करताना ‘फाइव्ह-स्टाेर रेस्टॉरंट्स’ असलेल्या हॉटेल्सना प्राधान्य देतात.

फूडव्यतिरिक्त भारतीय पर्यटक गंतव्याच्या संस्कृतीला देखील अधिक महत्त्व देतात. देशातील रहिवाशी सणासुदीच्या काळादरम्यान ऐतिहासिक आणि पौराणिक गंतव्यांना देखील प्राधान्य देतात. जनरेशन एक्स (७२ टक्के)आणि बेबी बूमर्स (७५ टक्के ) प्रवास करताना संस्कृती, परंपरा आणि वारसा असलेल्या गंतव्यांना प्राधान्य देतात, तर ६४ टक्के जनरेशन झेड या गंतव्यांना प्राधान्य देतात. पण तरूण भारतीय – जनरेशन झेड (५८ टक्केे) आणि मिलेनियल्स‍ (५६ टक्के ) साहसी गंतव्यांना प्राधान्य देतात, तुलनेत हे प्रमाण बेबी बुमर्ससाठी ३६ टक्केे आहे.