काय दडलंय या कात्रीमागे?

मुंबई: झी मराठीचं सोशल मीडिया हॅक झालंय का की काही ग्लिच आलाय? काय चाललंय झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर? या युगात डिजिटल ग्लिच ही सामान्य गोष्ट आहे, झी मराठीने याच संकल्पनेचा वापर करून काहीतरी एक मनोरंजक कल्पना आखली आहे. झी मराठीने प्रमोशनसाठी टाकलेले मालिकांचे व्हिडिओ व्हर्च्युअल कात्रीने मध्यभागी कापले जात आहेत. ज्यामुळे क्लिप्स दोन तुकड्यात पाहाव्या लागत आहेत त्यामुळे प्रेक्षक गोंधळून गेले आहेत की हे चाललंय तरी काय? या सर्व प्रकारामुळे नेटिझन्समध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावरील एका गोंधळलेल्या यूजरने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय, “सुरुवातीला मला वाटलं की माझा फोन खराब होत आहे. हे व्हिडीओज असे कट का होत आहेत, मला काहीच कळत नव्हतं.” झी मराठीवरील या क्लिप्स पाहून अशा बऱ्याच गोंधळलेल्या यूजर्सच्या प्रतिक्रिया दिसत आहेत.

काय दडलंय या कात्रीमागे? जाणून घेण्यासाठी फॉलो करा करा झी मराठीचं ऑफिशिअल पेज आणि पाहत राहा झी मराठी!